Solapur: सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांच्या फोटोला दुग्धाभिषेक

सोलापूर (प्रतिनिधी ): भारतीय जनता पार्टीने सोलापूर सह राज्यात वेगळ्या ठिकाणी नाना पटोले यांच्या पाय धुणे संदर्भात या घटनेच्या विरोधात आंदोलन केले होते. याला प्रत्युत्तर देत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे व जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली चार पुतळा चौकात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आले.

या प्रसंगी कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी भाजपच्या नेत्यावर सडकून अशी टीका केली. पुढे ते म्हणाले की भाजपाने आंदोलन करण्याऐवजी स्वतःचे 23चे 09 खासदार का झाले? यावर आत्मचिंतन करावे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली 14 खासदार महाराष्ट्रात निवडून आले. काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष झाला. परंतु वैफल्यग्रस्त झालेल्या भाजप नें उगीचच आंदोलन करून स्वतः चे हसे करून घेतले. असे म्हणाले


काल अकोला जिल्ह्यातील वाडेगाव या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी आली असता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नाना पटोले हे वारकऱ्या समावेश त्या ठिकाणी दर्शन घ्यायला गेले होते परंतु पावसाने चिखल झाल्याने नानाभाऊंचे पाय चिखलाने माखल्याने कार्यकर्त्याने पाणी आणून दिले.

लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने नानाभाऊ पटोले यांनी महाराष्ट्रात भाजपचा सुफडा साफ केला त्याच पद्धतीने आता राज्यात सुद्धा महाविकासाघाडीचे सरकार नाना आणतील याची भीती भाजपाच्या मनात आहे असे जिल्हा संघटक रमेश हसापुरे टीका केली.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेव फुलारी, मोतीराम राठोड,एम.एस. मुंडेवाडीकर, अमर पाटील कंदलगाव, समर्थ हिटनळी, काशिनाथ होनराव, रुद्रप्पा कांबळे, नागेश पडनुरे, परशुराम राऊतराव, यशवंत नानाजी, अमिन शेख, नंदू पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.