गावगाथा

आकाशवाणी आणि संगमेश्वर पब्लिक स्कूल आयोजित वक्तृत्व, रंगभरण व पत्रलेखन स्पर्धा संपन्न

मुलांना आवडीच्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून द्या* - अभियंता अर्चिता ढेरे

कर्मयोगी अप्पासाहेब जयंती

आकाशवाणी आणि संगमेश्वर पब्लिक स्कूल आयोजित
वक्तृत्व, रंगभरण व पत्रलेखन स्पर्धा संपन्न

*मुलांना आवडीच्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून द्या*
– अभियंता अर्चिता ढेरे
” पालकांनो सध्याचे युग हे स्पर्धेचे आणि तंत्रज्ञानाचे आहे प्रत्येक क्षेत्रात तीव्र स्पर्धा आहे. या स्पर्धेत सामील होताना मुले मशीन न होता माणूस कसे बनतील याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. गुणवत्तेसाठी स्पर्धा जरूर करावी. मात्र त्याचा अतिरेक न करता मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून द्या .ती नक्कीच यशस्वी बनतील.” असे प्रतिपादन आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या अभियांत्रिकी विभागप्रमुख अर्चिता ढेरे यांनी केले. त्या आकाशवाणी आणि संगमेश्वर पब्लिक स्कूल आयोजित आंतरशालेय रंगभरण, वक्तृत्व आणि पत्रलेखन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी या स्पर्धा संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये होतात. याप्रसंगी व्यासपीठावर श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन समिती सदस्या शितल काडादी, प्राचार्या प्रियंका समुद्रे परीक्षक संजीव समन, इमरान सय्यद ,शिवराज देसाई,श्यामसुंदर माने,अश्विनी बिराजदार ,मानसी झळकेकर
आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते कर्मयोगी आप्पांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य प्रियंका समुद्र यांनी प्रास्ताविक केलं. पाहुण्यांची ओळख वंदना श्रीमल यांनी करून दिली. संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या तसेच परीक्षकांचा सत्कार झाला. आकाशवाणीच्या माध्यमातून मातृभाषेच्या वैविध्यपूर्ण माहिती मनोरंजनाच्या बाबी शिकायला मिळतात. असे सांगत ढेरे यांनी विद्यार्थी स्पर्धक, पालकांशी अदिलखुलास संवाद साधला.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वीणा अन्नलदास, मेहजबीन सय्यद, हरीश पुठ्ठा, सुरज दिंडोरे, शोभा गोटे , सांस्कृतिक विभागातील शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन प्रीती दुलंगे यांनी केले तर आभार उमाअश्विनी नारा यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button