श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात चपाती बनविण्याकरिता चपाती मेकर यंत्र बसविण्यात आले यंत्राचे पूजन स्वामी भक्त,देणगीदार व महिला सेवेकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
चपाती मेकर यंत्राकरिता सागर महाअपसेकर कोल्हापूर यांचे बहुमोल सहकार्य लाभले

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात चपाती बनविण्याकरिता चपाती मेकर यंत्र बसविण्यात आले यंत्राचे पूजन स्वामी भक्त,देणगीदार व महिला सेवेकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.


अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामी भक्तांना सुलभ सोयी-सुविधा उपलब्द करून देण्याकरिता न्यासाची आग्रही भूमिका असते, अन्नछत्र मंडळात अत्याधुनिक पध्दतीचा अवलंब करीत गेल्या ३६ वर्षाची वाटचाल सुरु आहे, न्यासाकडून चपाती बनविण्याकरिता चपाती मेकर यंत्र बसविण्यात आले असून, या यंत्राचे पूजन गुरुवारी या शुभदिनी स्वामी भक्त, देणगीदार व महिला सेवेकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.


श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची कार्य भक्ताभिमुख असल्याने आलेल्या स्वामी भक्त हा न्यासाला भेट देऊन महाप्रसाद घेतोच, भक्तांसाठी केलेल्या आवश्यक सोयी-सुविधा ह्या गरज ओळखून मांडणी करण्यात आलेली आहे.

न्यासाचे महिला सेवेकरी शांताबाई यादव, मीनाबाई पवार, शांताबाई विभूते, महानंदा मंगरुळे, महादेवी वाडे, इंदुबाई कुर्ले, रेणुका चुंगीकर, सुनिता कुर्ले, वर्षा मिनगले व स्वामी भक्त, देणगीदार यांच्या हस्ते चपाती मेकर या यंत्राचे पूजन करून भक्ताअर्पण करण्यात आले. या चपाती मेकर यंत्राकरिता सागर महाअपसेकर कोल्हापूर यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, संभाजी पवार, लाला निंबाळकर, कुमार सलबत्ते, चंदू हिबारे, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.