गावगाथा

मरणोत्तर देहदान करणारे आदर्श शिक्षक कमलाकर मोटे यांचा सेवापुर्तीबद्ल सत्कार

सेवानिवृत्ती सोहळा

मरणोत्तर देहदान करणारे आदर्श शिक्षक कमलाकर मोटे यांचा सेवापुर्तीबद्ल सत्कार

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

मुरुम, ता. उमरगा, ता. ८ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तथा मरणोत्तर देहदान करणारे जिल्हा परिषद मुरुम बीटचे केंद्रप्रमुख कमलाकर श्रीमंतराव मोटे यांचा रविवारी (ता. ७) रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात मोटे परिवाराच्यावतीने सेवापुर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्यांचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत येथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक शिवशंकर स्वामी गुरुजी होते. यावेळी लातूरचे ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, अहमदपूरचे माजी प्राचार्य डॉ. नागनाथ मोटे, लातूरचे डॉ. श्रीकांत गायकवाड, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, उमरगाचे विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंखे, मुरुम बीटचे विस्तार अधिकारी जीवराज पडवळ, आष्टाकासारचे उपसरपंच वसंतराव सुलतानपूरे, लातूरचे विद्या विकास संस्थेचे बजरंग चोले, शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष विलास कंटेकुरे, मातोश्री अंजनाबाई व सौभाग्यवती महानंदा मोटे, संघटनेचे विक्रम पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राष्ट्रगीत व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कमलाकर मोटे यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रफीत उपस्थितांना दाखविण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड, कोळसा, ता. सेनगाव येथील विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्कर बेंगाळ, माकणीचे प्रा. डॉ. अनिल गाडेकर, तृप्ती अंधारे, विक्रम पाटील, दिपाली मोटे, डॉ. वंदना जाधव, सुभाष वैरागकर, विजयकुमार देशमाने, शिवकांता चिलगर, विजय ओवांडकार, मोटे सरांच्या नाती माई मोटे व इशिता मोटे, काजल कांबळे आदींनी कमलाकर मोटे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्ल मनोगतातून भावना व्यक्त केल्या. O याप्रसंगी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे बोलताना म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्राच्या इतिहासात आपण डोकावून पाहिले तर आज शिक्षण क्षेत्रात अपेक्षित गुणवत्ता दिसत येत नाही, असे विविध सर्वेक्षण अहवालावरून दिसून येते. गुणवत्तेबाबत आज प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. गुणवत्तेच्या अनुषंगाने आज ज्या अपेक्षा केल्या जात आहेत. त्या खऱ्या अर्थाने पूर्ण होताना दिसत नाहीत. ज्ञान हा सत्याचा मार्ग आहे. त्यामुळे शिक्षणातून सत्याची पेरणी अपेक्षित आहे. शिक्षणातून माणसाचे मस्तक घडून त्यातून सक्षम समाज निर्माण होत असतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील श्री. मोटे यांनी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्य केल्यानेच आज त्यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये नावारुपाला येत असल्याचे शेवटी ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी स्वामी म्हणाले की, या कार्यक्रमाला एवढी मोठी गर्दी म्हणजेच खऱ्या अर्थाने मी गुरु असल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते. सत्काराला उत्तर देताना शिक्षक-मुख्याध्यापक ते केंद्रप्रमुख म्हणून कार्य करताना श्री. मोटे यांना जे अनुभव आले. त्यांचा लेखाजोखा मांडून सर्वांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करून सर्व उपस्थितांचे आभार मानले. मोटे यांचा रोटरी क्लब मुरुम सिटी, विविध शाळेतील मुख्याध्यापक, सहशिक्षक, सहकारी मित्र, नातेवाईक व विविध क्षेत्रातील पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच त्यांच्या आष्टाकासार येथील ग्रामस्थ आदींनी त्यांचा यथोचित सत्कार केला. दुर्गाप्रसाद मोटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन प्रविण स्वामी व संगिता डोकडे तर आभार प्रतिक मोटे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुटुंबातील सदस्य व मित्र परिवाराने परिश्रम घेतले. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील रत्नमाला मंगल कार्यालयात आयोजित कमलाकर मोटे यांच्या सेवापुर्ती सोहळ्याच्या उद्धाटनप्रसंगी सोमनाथ रोडे, शिवशंकर स्वामी, श्रीकांत गायकवाड आदी मान्यवर व अन्य.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button