
*चपळगाव सेमी इंग्लिश स्कूलमध्ये वेशभूषा उपक्रम संपन्न!*


चपळगाव
ग्रामीण विद्या विकास सेमी इंग्लिश स्कूल चपळगाव येथे आज नर्सरी, LKG व UKG विद्यार्थ्यांचे विविध वेशभूषा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

प्रथम सर्व अतिथी, पालक, गुरुजन वर्गांचे स्वागत करून सरस्वतीदेवी प्रतिमा पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती प्रगती यु. बानेगाव व अतिथी म्हणून श्रीमती ज्योती गौ. दोड्डाळे आणि श्रीमती संगीता ल. पाटील हे होते.

उपक्रमाचे प्रास्ताविक कु. गोविंदे मॅडम यांनी केले.
तद्दनंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे सेमी इंग्लिश स्कूलच्या वतीने सन्मान करण्यात आले.
व्यासपीठावर पर्यवेक्षक माने सर, CEO नीलकंठ पाटील सर,श्री काळे, श्री दावनपल्ली, थवंटे सर, भकरे सर, दुलंगे सर व माता पालक उपस्थित होते.
यानंतर LKG वर्गाचे शिक्षिका श्रीमती उपासे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे ओळख करून दिले.

प्रथम नर्सरी,त्यानंतर LKG व UKG वर्गाकडून विद्यार्थी वेशभूषा सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विठ्ठल, श्री कृष्ण, राधा, म. गांधी, म. फुले, सुभाषचंद्र बोस, पं.नेहरूजी,डॉक्टर, शेतकरी,पोलीस, आर्मी,दक्षिण भारतीय, पारंपरिक वेश,महाराष्टीयन पेहराव पासून मॉडर्न ड्रेसमध्ये विद्यार्थी उपस्थित होते.
सर्व विद्यार्थी रांगेत आपल्या खास शैलीमध्ये व चेहऱ्यावर हास्य ठेवून आपली वेशभूषा दाखवत होते.
विद्यार्थी व पालकांमध्ये या उपक्रमाबद्दल खूप मोठा उत्साह व आनंद होता.
श्रीमती म्हमाणे मॅडम, श्रीमती उडचाण मॅडम,श्रीमती पाटील मॅडम, श्रीमती इंगुले मॅडम यांनी परीक्षकांचे काम पहिले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी
प्री -प्रायमरीचे सर्व मॅडम, श्रीमती शेख मॅडम, श्रीमती पट्टनशेट्टी मॅडम व मदतनीस श्रीमती नारंगकर मॅडम,श्रीमती डोळळे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमास पालक वर्गांचा सुद्धा खूप मोठे सहकार्य लाभले.
संस्थेचे संचालक श्री. गुलाब बानेगाव यांच्याकडून विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ठरित्या सूत्रसंचालन UKG वर्गाचे शिक्षिका श्रीमती मठपती मॅडम यांनी केले तर आभार नर्सरी वर्गाचे श्रीमती शिंदे मॅडम यांनी मानले.