स्वामी भक्ती व अक्कलकोट वारीला पुणेकरांचे प्रथम प्राधान्य – दीपकभाऊ मानकर
दीपकभाऊ मानकर यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे दत्ताभाऊ सागरे व अन्य दिसत आहेत.
स्वामी भक्ती व अक्कलकोट वारीला पुणेकरांचे प्रथम प्राधान्य – दीपकभाऊ मानकर
प्रतिनिधी अक्कलकोट,
(श्रीशैल गवंडी) – मी माझे कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या समवेत तमाम पुणेकर हे श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहेत, त्यामुळे पुणे शहर व परिसरातील नागरिक भाविकांच्या स्वामी भक्तीमुळे पुणे शहरात स्वामी भक्तीचा आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा जोपासला जात आहे. शहरातील धावपळीच्या जीवनातही पुण्यातील भावीक प्राधान्याने सुट्टीच्या काळात स्वामी दर्शनाला अक्कलकोटला येण्याची कास धरतात. या माध्यमातून पुण्यातील अनेक भाविक दर पौर्णिमेला विशेषतः त्रिपुरारी पौर्णिमेला पंढरीच्या वारकऱ्यांच्या पंढरी वारी प्रमाणे पुणेकर अक्कलकोटची वारी करून स्वामी दर्शन घेतात. या अनुषंगाने आम्हालाही स्वामीभक्तीची व स्वामी दर्शनाची ओढ आहेच, त्यामुळे वेळोवेळी आमच्यासह अनेक पुणेकर भाविकांनी येथे येऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतल्याच्या समाधानाला मोल नाही, म्हणून स्वामी भक्ती व अक्कलकोट वारीला पुणेकरांच्या जीवनात प्रथम प्राधान्य असल्याचे मनोगत पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिपकभाऊ मानकर यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दीपकभाऊ मानकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी दीपकभाऊ मानकर बोलत होते. पुढे बोलताना मानकर यांनी अवघ्या तीन दिवसानंतर असलेल्या त्रिपुरारी पौर्णिमेला असंख्य पुणेकर स्वामी दर्शनाकरिता दिंडी व पालखीसह पायी चालत येत असतात. आलेल्या सर्व स्वामी भक्तांच्या दर्शनाचे उत्तम नियोजन करण्याची सेवा महेश इंगळे व त्यांचे वडील व मंदिर समितीचे तत्कालीन चेअरमन अमर स्वामीसेवक बाळासाहेब इंगळे हे अगदी त्याग, सेवा, समर्पण यांचा त्रिवेणी संगम साधून करीत आल्याचे प्रत्यक्ष पाहून खूप समाधान वाटत असल्याचे मनोगतही मानकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी व्यंकटेश पुजारी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी,
पुण्याचे माजी नगरसेवक दत्ताभाऊ सागरे, राजेश जैस्वाल, शंकर राय, नितीन मानकर, अजय खंदारे, विनोद घोडे, विशाल देशमुख, शिवराज स्वामी, बसवराज कोळी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, नितीन जाधव, सागर गोंडाळ, विपूल जाधव इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – दीपकभाऊ मानकर यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे दत्ताभाऊ सागरे व अन्य दिसत आहेत.