गावगाथाठळक बातम्या

School bus fees: पालकांच्या खिशाला कात्री बसणार…! स्कूल बसच्या भाड्यात इतक्या टक्क्यांनी वाढ… कारणही समोर…

पुणे (प्रतिनिधी): शाळांतील विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था केलेली असते. या स्कूलबसचे भाडे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दिले जाते. परंतु, आता विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला झटका बसणार आहे.

कारण शालेय स्कूल बसच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय बस मालकांनी घेतला आहे. राज्य सरकारने बस भाड्यात 14.95 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्कूल बस मालकांनीही शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा खर्च आणखी वाढणार आहे.

 

बसच्या स्पेअर पार्ट्सच्या वाढत्या किंमती, विद्यार्थांच्या सुरक्षिततेसाठी जीपीएस यंत्रणा, चालक, महिला व परिचारिका आणि व्यवस्थापकांचे वेतन, सीसीटीव्ही कॅमेरे, वाहनतळाच्या शुल्कात वाढ अशा कारणांमुळे ही शुल्क वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक सेवा देण्यासाठी 2025 मध्ये 18 टक्क्यांनी शुल्क वाढ करण्यात येणार आहे, अशी माहती स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button