गावगाथा

अक्कलकोट पंचायत समितीचे नूतन सभापती रश्मि हिप्परगी, उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांचा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार.

निवड नियुक्ती

अक्कलकोट पंचायत समितीचे नूतन सभापती रश्मि हिप्परगी, उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांचा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.१२/०३/२६)
तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू तथा येथील पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टीचे नुतन उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांची आज अक्कलकोट पंचायत समितीच्या उपसभापती निवड झाली.
यानिमीत्ताने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने
समितीचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी पंचायत समिती येथे नूतन सभापती रश्मी हिप्परगी, नुतन उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. उपसभापती पद लाभल्यानंतर मंदीर समितीचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या माध्यमातून लगेच श्री स्वामींची प्रतिमा, कृपावस्त्र, व प्रसाद लाभणे हे माझ्यासाठी खुप भावनिक क्षण आहे. या निमीत्ताने माझ्या उपसभापती पदाच्या पुढील कार्यकालास श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद पाठीशी असतील. श्री स्वामी समर्थांचे आशिर्वाद व माझे मोठे बंधू तथा तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी व महेश मालक इंगळे यांच्या राजकीय क्षेत्रातील अनुभवाचा लाभ घेऊन लोकहीताची कामे करण्यास आपण कटीबद्ध असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, नूतन सभापती रश्मी हिप्परगी, प्रथमेश इंगळे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, नगरसेवक अविनाश मडीखांबे, तम्मा शेळके, महेश हिंडोळे, मा.नगरसेवक उत्तम गायकवाड, खाजप्पा झंपले आदिसह नागरिक व प्रशासकीय अधिकारी वर्ग उपस्थित होते.
फोटो ओळ – नूतन सभापती रश्मी हिप्परगी व उपसभापती सागर
कल्याणशेट्टी यांचा श्री स्वामी समर्थांची प्रतिमा व कृपावस्त्र देऊन सत्कार करताना नगरसेवक व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button