*ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत अभिमन्यु वमने देशात २५ वा क्रमांक*
वागदरी गावाचे सुपुत्र प्रा. सुधीर वमने व सौ. अश्विनी वमने यांचा मुलगा आणि श्री. शिवशरण वमने यांचा नातू चि. अभिमन्यु वमने याने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (BDS) परीक्षा २०२६ मध्ये संपूर्ण भारतातून २५ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अभिमन्यु सध्या माने इंटरनॅशनल स्कूल (CBSE बोर्ड), रत्नागिरी येथे इयत्ता दुसरीत शिक्षण घेत आहे.
ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करण्याच्या उद्देशाने घेण्यात येणारी स्पर्धा परीक्षा असून त्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता (Intelligence) आणि विज्ञान या विषयांवरील विद्यार्थ्यांची आकलन क्षमता तपासली जाते.
या परीक्षेत अभिमन्युने गणितात ४७, बुद्धिमत्ता चाचणीत २३ आणि विज्ञानात २५ असे एकूण ९५ गुण (१०० पैकी) मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशाबद्दल अभिमन्युला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षीही त्याने या परीक्षेत संपूर्ण भारतातून सुवर्णपदकासह ३२ वा क्रमांक मिळवला होता.
लहान वयातच मिळवलेल्या या यशाबद्दल शिक्षकवर्ग, कुटुंबीय तसेच समाजातील मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!