गावगाथा

दिव्यांग झी कन्नड सारेगमप गायक रेवणसिद्ध फुलारी यांना कर्नाटक रत्न पवर स्टार पुनीत राजकुमार पुरस्कार

दिव्यांग झी कन्नड सारेगमप गायक रेवणसिद्ध फुलारी यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या वेळी चॅनेल प्रमुख डॉ. साई सतीश तोटय्या,मार्गदर्शक शरणप्पा फुलारी आदी उपस्थित होते

दिव्यांग झी कन्नड सारेगमप गायक रेवणसिद्ध फुलारी यांना कर्नाटक रत्न पवर स्टार पुनीत राजकुमार पुरस्कार

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट –
तालुक्यातील तोळणूर येथील दिव्यांग गायक झी कन्नड सारेगमप सिंगर रेवणसिद्ध फुलारी यांना मानाचा
कर्नाटक रत्न पवर स्टार पुनीत राजकुमार अवॉर्ड 2026 हा मानाचा पुरस्कार दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार टीव्ही 4 न्यूज चॅनलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात देण्यात आला.
बेंगळुरू येथील डॉ. बी.आर. आंबेडकर भवन यलहंका बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कन्नड चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते ,अभिनेत्री,प्रसिद्ध गायक यांच्या उपस्थितीत टीव्ही फोर कन्नड न्यूज चॅनेल प्रमुख डॉ. साई सतीश तोटय्या यांच्या हस्ते रेवणसिद्ध फुलारी यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,प्रसिद्ध अभिनेते कर्नाटक रत्न पुनीत राजकुमार यांच्या मूर्ती व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
संगीत क्षेत्रात आपल्या प्रतिभेच्या जोरावर विशेष ओळख निर्माण करणाऱ्या रेवणसिद्ध फुलारी यांच्या या यशाबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास अनेक कलाकार, बिग बॉस सीजन 12 चे स्पर्धक ,मान्यवर व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : बेंगळुरू यलहंका येथे डॉ.बी.आर.आंबेडकर भवनात आयोजित कार्यक्रमात दिव्यांग झी कन्नड सारेगमप गायक रेवणसिद्ध फुलारी यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या वेळी चॅनेल प्रमुख डॉ. साई सतीश तोटय्या,मार्गदर्शक शरणप्पा फुलारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button