गावगाथा

कोल्हापूर येथील स्वामी भक्त विरेश पांचाळ यांच्या निवासस्थानी नगरसेवक महेश इंगळे यांचा सन्मान

सन्मान

कोल्हापूर येथील स्वामी भक्त विरेश पांचाळ यांच्या निवासस्थानी नगरसेवक महेश इंगळे यांचा सन्मान

(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.१५/०४/२६)
कोल्हापूर येथील स्वामी भक्त, तथा श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाचे संचालक विरेश पांचाळ यांच्या निवासस्थानी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी नुकतेच आपल्या मित्र परिवारा सोबत कोल्हापूर येथील स्वामी भक्त विरेश पांचाळ यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट दिली. यावेळी स्वामी भक्त विरेश पांचाळ व कुटूंबियांच्या वतीने सलग ६ व्या टर्ममध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील स्वामी सेवेबद्दल नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विरेश पांचाळ यांनी यथोचित सत्कार केला. इंगळे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनेही स्वामी भक्त विरेश पांचाळ व कुटूंबियांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन महेश इंगळे यांनी यथोचित सत्कार केला.

यावेळी श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ संस्थेचे अध्यक्ष नारायण बुधले, विश्वस्त प्रकाश चव्हाण, जयसिंग जाधव, सुहास घाटगे, प्रा.शिवशरण अचलेर सर, श्रीकांत झिपरे, अमर पाटील, चंद्रकांत सोनटक्के, सुनील पवार, सोमनाथ सुतार, खाजप्पा झंपले, मनोज इंगोले, मेजर अमोल माने, बाबा सुरवसे, रामलिंगया स्वामी, मधुकर सदाफुले, सुरेश वाले सर, अंकुश केत, नंदकुमार जगदाळे, बाळासाहेब एकबोटे, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, तुषार मोरे, अमोल महाडिक, दर्शन घाडगे, प्रतीक इंगळे, आदित्य गवंडी, स्वामीराव मुसळे,
दशरथ लोंढे, रमेश शिंदे, संतोष पराणे, सचिन किरनळी, कुमार हत्तुरे, रमेश कणबसे, मनोज जगताप सर, नामदेव माने साहेब, लखन सुरवसे, स्वप्निल गायकवाड, आशिष सातपुते, आदित्य जगदाने, उदय जमगे, साईबाबा इंगळे,
संदीप पंडित, विश्वनाथ देवरमनी सर, सिद्धू बिडवे आदींसह विरेश पांचाळ व कुटूंबीय उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button