कै.कल्याणराव इंगळे यांच्या १० व्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
कै.कल्याणराव इंगळे यांच्या १० व्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त मैंदर्गी रोड,
समर्थ पार्क येथील कै.कल्याणराव इंगळे उद्यानाचे लोकार्पण व उद्यानातील महालक्ष्मी मंदीर सुशोभिकरण व पुजन,
कै.कल्याणराव इंगळे अर्धपुतळ्याचे
अनावरण.
महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कै. कल्याणराव इंगळे यांच्या अर्ध पुतळ्यास करण्यात येणार अभिवादन.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट.दि.१६/०३/२६) येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मा.चेअरमन व स्वामी सेवक कै.कल्याणराव उर्फ बाळासाहेब इंगळे यांच्या १० व्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे चेअरमन तथा नगरसेवक – स्वामी सेवक महेश इंगळे यांनी दिली.
बुधवार दिनांक १८ मार्च रोजी
कै.कल्याणराव इंगळे यांच्या १० व्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुरोहित प.पू.मोहनराव (गुरुजी) पुजारी, हिरेमठ गौडगांव संस्थानचे शिवाचार्यरत्न श्री.ष.ब्र.डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी, जगदगुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान नागणसूर तुप्पीन मठाचे श्री.म.नि.प्र.डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी, अक्कलकोट विरक्त मठाचे श्री.म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी, मादन हिप्परगा विरक्त मठाचे श्री.म.नि.प्र.अभिनव महाशिवलिंगेश्वर महास्वामीजी,
हत्तीकणबस विरक्त मठाचे श्री.म.नि.प्र. प्रभूशांत स्वामीजी, अक्कलकोट शिवपूरीचे संस्थापक प.पू.डॉ.पुरूषोत्तम राजीमवाले महाराज, श्री.स्वामी समर्थ समाधी मठाचे वे.शा.प.पू.अण्णू महाराज पुजारी यांच्या दिव्य सान्निध्यात व माननीय आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली मैंदर्गी रोड, समर्थ पार्क येथील कै.कल्याणराव इंगळे उद्यानाचे लोकार्पण व उद्यानातील महालक्ष्मी मंदीर सुशोभिकरण व पुजन तसेच कै. कल्याणराव इंगळे अर्धपुतळ्याचे सकाळी १० वाजता अनावरण व मालार्पण होईल.
या नंतर देवस्थान संचलित कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयात देवस्थानचे व महाविद्यालयाचे माजी चेअरमन कै. कल्याणराव इंगळे व कै.उमेश इंगळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कै.कल्याणराव इंगळे
तंत्रनिकेतन महाविद्यालयातील कै.कल्याणराव इंगळे यांच्या अर्धपुतळ्यास व कै.उमेश इंगळे यांच्या प्रतीमेस महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात मान्यवरांच्या हस्ते अभिवादन सोहळा संपन्न होईल.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, महाराष्ट्र राज्य शिवभक्त प्रतिष्ठानचे पै.अनिकेतभाऊ घुले, करमाळा पंचायत समितीचे मा.सभापती संपतराव शिंदे, कराड येथील हुतात्मा बहुउद्देशीय अपंग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष सुनील फडतरे, पुणे येथील यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे चेअरमन गणेश
करे-पाटील, मडगाव गोवा येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचे संस्थापक जयेश नाईक, माजी पंचायत समिती सदस्य सिद्धेश्वर स्वामी, चिपळूण येथील उद्योजक डॉ.विलास मोरे, डॉ.विजय माटे
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.
यानंतर कै.कल्याणराव इंगळे यांच्या १० व्या पुण्यस्मरण दिनानिमीत्त कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन आणि श्री स्वामी समर्थ रूग्णालयात विविध उपक्रम संपन्न होतील. या उपक्रमांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते होईल.
यामध्ये आरोग्य शिबीर, ॲक्युप्रेशर शिबीर, रक्तदान शिबीर, सोलापूर जिल्हा इंग्रजी कार्यशाळा, कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन कडून गुणीजन पुरस्कार, कराड येथील हुतात्मा अपंग बहूउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने गुणीजनांना राष्ट्रीय पुरस्कार, महाप्रसाद, श्री.स्वामी समर्थ रुग्णालयात जनरल फिजीशीयन डॉ.स्वप्निल हिप्परगी, डॉ.रोहित कुंभार, नेत्ररोग तज्ञ डॉ.स्वप्ना हिप्परगी, डॉ.राजेश मलंग, दंतरोग तज्ञ डॉ.नम्रता पवार यांच्या वतीने सर्वरोग निदान आरोग्य शिबीर संपन्न होणार आहे, तरी गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदीर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी केले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!