गावगाथा

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने पवित्र रमजान ईद निमित्त मुस्लीम सेवेकऱ्यांना विशेष किटचे वाटप

सामाजिक बांधिलकी

रमजान ईद निमित्त मुस्लीम सेवेकऱ्यांना किटचे वाटप
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने पवित्र रमजान ईद निमित्त मुस्लीम सेवेकऱ्यांना विशेष किटचे वाटप रविवारी करण्यात आले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते सचिव शामराव मोरे व विश्वस्त भाऊ कापसे यांच्या उपस्थितीत मुस्लीम सेवेकऱ्यांना रमजान ईद निमित्त किटचे वितरण करण्यात आले. सामाजिक सलोखा आणि सर्वधर्म समभाव जपत अन्नछत्र मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम आयोजित केला.
न्यासाकडून देण्यात आलेल्या किटमध्ये रमजानच्या पवित्र महिन्यात आणि ईदच्या दिवशी बनविण्यात येणाऱ्या शीरखुर्मा व इतर पारंपरिक पदार्थांसाठी लागणारे साहित्य देण्यात आले होते. या उपक्रमामुळे सेवेकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी मनोज निकम, मैनोद्दीन कोरबू, प्रवीण देशमुख, शहाजी यादव, बाळासाहेब घाटगे, अतिश पवार, प्रसाद मोरे, शुभम सावंत, किरण साठे, स्वामिनाथ बाबर, संभाजी पवार, बाबुशा महिंद्रकर, सतीश महिंद्रकर, इरफान शेख, इम्रान पठाण, अनिस इनामदार, अल्ताफ कोरबू, सर्फराज शेख, असद फुलारी, एस. के. स्वामी, शिव स्वामी, महांतेश स्वामी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, मल्लिनाथ कोगनुरे, खंडेराव होटकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे अक्कलकोटमध्ये सर्वधर्म समभाव व सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button