गावगाथा

अंगद पवळे लिखित चला शिकूया या ग्रंथाचे प्रकाशन…..

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सभागृहात पुस्तक प्रकाशन करताना प्राचार्य संजय गवई, डॉ. श्रीकांत गायकवाड, लेखक अंगद पवळे, उपप्राचार्य राजकुमार लखादिवे, डॉ. सतिश शेळके, डॉ. महेश मोटे व अन्य.

अंगद पवळे लिखित चला शिकूया या ग्रंथाचे प्रकाशन…..

लातूर,  (प्रतिनिधी) : लातूरचे रहिवाशी तथा चलबुर्गा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तंत्रस्नेही सहशिक्षक अंगद पवळे लिखित ‘ चला शिकूया ‘ या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच बसवेश्वर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, प्रा. डॉ. सतिश शेळके, प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. सुप्रिया बिराजदार, प्रा. शिवशरण हावळे, प्रा. देवदत्त मुंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी या ग्रंथाबाबत बोलताना म्हणाले की, पवळे सरांनी प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठीचा एक उत्तम प्रयोग साहित्यातून आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष कौतुक करून अभिनंदन केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. श्रीकांत गायकवाड यांनी पवळे सर हे एक उपक्रमशील शिक्षक असल्याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो. त्यांचा हा प्रयत्न निश्चितच दिशादर्शक ठरेल. उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे मनोगत व्यक्त करताना लातूरच्या संत शिरोमणी सावता महाराज प्रकाशनाकडून १ ते ६ भागात मूळ अक्षरांची ओळख, दर्जेदार कौशल्य वापरून मांडणी करण्यात आली आहे. अंगद पवळे यांनी पुस्तकाच्या प्रकाशनाबाबतची भूमिका, स्वरूप व त्यातील महत्त्वपूर्ण तंत्र-कौशल्य विस्ताराने मांडली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. देवदत्त मुंढे तर आभार जयश्री पवळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विविध शाखांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. फोटो ओळ : लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सभागृहात पुस्तक प्रकाशन करताना प्राचार्य संजय गवई, डॉ. श्रीकांत गायकवाड, लेखक अंगद पवळे, उपप्राचार्य राजकुमार लखादिवे, डॉ. सतिश शेळके, डॉ. महेश मोटे व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button