माधवराव पाटील महाविद्यालयाकडून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीकरिता पदयात्रा
येथील माधवराव पाटील महाविद्यालयाकडून काढण्यात आलेल्या पदयात्रेप्रसंगी प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृद्ध व विद्यार्थी-विद्यार्थिनी

माधवराव पाटील महाविद्यालयाकडून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीकरिता पदयात्रा

मुरूम, ता. उमरगा, ता.


(प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० च्या अंमलबजावणीसाठी सप्ताह साजरा करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती व्हावी व तळागाळातील घटकांपर्यत जनजागृती झाली पाहिजे. या उद्देशाने शुक्रवारी (ता. २८) रोजी महाविद्यालय ते नगर परिषद दरम्यान पदयात्रा काढण्यात आली. याप्रसंगी या धोरणास आम्ही सर्वजण तयार आहोत. या आशयाच्या फलकासह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या जनजागृती रॅलीचे उद्घाटन प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी केले. महाविद्यालयातील आयक्युएसीचे समन्वयक प्रा. डॉ. किरणसिंग राजपूत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कुठल्याही शाखेचा अभ्यासक्रम मातृभाषेतून शिकवला जाणार आहे. त्यामुळे बहुभाषिकतेला महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक किंवा स्थानिक भाषेतून शिक्षण मिळवण्याचे स्वातंत्र विद्यार्थ्यांना मिळेल. त्यातूनच मातृभाषेचा स्वाभिमान वाढेल, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे उपस्थित होते. त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणात येणाऱ्या अडचणी सांगताना एकसमान शिक्षण प्रणाली, ग्रामीण भागातील अपुऱ्या सेवासुविधा, ग्रामीण भागातील शिक्षण घेणारे विद्यार्थी शहरातील विद्यार्थ्यांशी बरोबरी करण्याचे आवाहन असेल असे मत मांडले. यावेळी एनइपीचे समन्वयक डॉ. सुजित मठकरी, डॉ. सुशील मठपती, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रा. दीपाली स्वामी, प्रा. प्रियंका काजळे, प्रा. राजनंदिनी लिमये, प्रा. योगेश पाटील आदींची उपस्थिती होती. डॉ. रविंद्र आळंगे, डॉ. संध्या डांगे, डॉ. शिला स्वामी, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. मुकुंद धुळेकर, डॉ. दिनकर बिराजदार, डॉ. सुधीर पंचगल्ले, दत्तु गडवे आदींनी पुढाकार घेतला. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयाकडून काढण्यात आलेल्या पदयात्रेप्रसंगी प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृद्ध व विद्यार्थी-विद्यार्थिनी
