गावगाथा

लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रशीद खिस्तके (राष्ट्रसंत तुकाराम महाराज समाजसेवा) पुरस्कार जाहीर .

पुरस्कार निवड

लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रशीद खिस्तके (राष्ट्रसंत तुकाराम महाराज समाजसेवा) पुरस्कार जाहीर .

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट प्रतिनिधी:(सोहेल फरास) अक्कलकोट शहरातील मौलाली गल्ली येथे राहणारा रशीद खिस्तके हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेले केवळ सामाजिक उत्तरदायित्व आणि लोकसेवेची आवड आणि आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाला आपल्याला काहीतरी देणे लागत म्हणून आपण या सामाजिक क्षेत्रात आलेला अक्कलकोट शहरातील एक उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता म्हणून अगदी अल्पवधीतच आपली एक आगळीवेगळी छाप सोडणारे मागील सहा ते सात वर्षापासून रॉबिन हूड आर्मी अक्कलकोट शहरातील गोरगरीब, वंचित,गरजवंतून अन्नपुरवठा सोबतच समाजकारण,अक्कलकोट शहरातील मनोरुगणावर उपचार, व बेवारस लोकांची अंत्यविधी असे सामाजिक कार्यात सक्रीय राहून गोर-गरिबांची लहान-सहान कामे करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. रशिद खिस्तके हा कधीही कोणत्याही व्यक्तीला मदत करत असताना त्याची जात धर्म विरोधक याचा कधी विचार केला नाही वेळ पडल्यावर स्वतःचे खिशातील पैसे देऊन गोरगरिबांची मदत केली व अंत्यविधीही केला आणि शक्य होईल तेवढी गरजवंतुची मदत केली. कोरोना सारख्या महामारी मध्ये लोकांना घरच्या बाहेर निघता येत नसताना शहरातील एक ठिकाणी होता व मित्रांना घेऊन अन्नदानीही केले. हिंदू मुस्लिम एक्य कायम राहावे म्हणून प्रत्येक समाजाच्या वतीने बोलावलेल्या कार्यक्रमास जयंती उपस्थित असतो. अशा अनेक समाजसेवा लोकसभा केलेले उदाहरण आहेत.
या सर्व कार्याची दखल घेवून लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रशीद खिस्तके (राष्ट्रसंत तुकाराम महाराज समाजसेवा) पुरस्काराचे वितरण छत्रपती संभाजीनगर येथील जलसंधारण महामंडळाची व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे यांच्या हस्ते तसेच राजेरायन मठाचे अध्यक्ष ॲड.शरद फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एका विशेष समारंभात होणार आहे
कुरनूर ता.अक्कलकोट मध्ये दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता पुरस्काराचे वितरण होणार असल्याची प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा पंचायत समिती माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे व कार्याध्यक्ष विनोद मोरे यांनी सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button