गावगाथा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वागदरी हिरोळी मार्गावर वाहनांची कसून तपासणी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वागदरी-हिरोळी या मुख्य मार्गावर दोन्ही राज्यांतील वाहनांची रात्रंदिवस कसून तपासणी करण्यात येत आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वागदरी हिरोळी मार्गावर वाहनांची कसून तपासणी..

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट — लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील वागदरी-हिरोळी या मुख्य मार्गावर दोन्ही राज्यांतील वाहनांची रात्रंदिवस कसून तपासणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सीमेत असलेले भाग्यवंती मंदिरासमोरील तात्पुरत्या शेडमधून कर्नाटकातून महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या लॉरी, टमॅटम, टेम्पो, जीप, कार यासह सर्व खासगी वाहनांची तपासणी करून त्यांची वाहन क्रमांक दाखल करण्यात येत आहे. संशयास्पद वाहनांची कसून तपासणी व चित्रीकरण करण्यात येत आहे. एक ग्रामसेवक, दोन पोलीस अधिकारी, दोन उत्पादन शुल्क अधिकारी, एक निरीक्षक, एक हवालदार, एक कॅमेरामन असे सहा जणांचे पथक दोन शिफ्टमध्ये वाहनांची तपासणी करत आहे.
हा मुख्य रस्ता असल्याने तपासणीला थोडा वेळ लागत असल्याने वाहने रांगेत उभी राहत असल्याने थोडीफार गर्दी होत आहे. याबाबत ग्रामसेवक रतन कलाल यांनी माहिती दिली असून त्यांना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी वाहनातून येणारी अवैध दारू, 50 हजाराहून अधिक रोख रक्कम, कागदोपत्री नसलेली मौल्यवान वस्तू व अवैध शस्त्रे तपासण्याचे आदेश दिले असून जनता सहकार्य करत आहे. वेळोवेळी वरिष्ठांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करीत आहे .
कर्मचाऱ्यांसाठी तात्पुरते शेड बांधण्यात आले असून, एक छोटा पत्र शेड असल्याने पुरेशी सावली नाही .कर्मचारी उन्हात तळपत आहेत. पाणी किंवा जेवणाची व्यवस्था नाही. कर्मचारी स्वत:च व्यवस्था करून काम करत आहेत. संबंधित विभागाने कर्मचाऱ्यांना चांगले व्यवस्था करून कर्मचाऱ्यांची सोय करण्याची गरज आहे.
ग्रामसेवक रतन कलाला, रतनसिंग चव्हाण, उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रोहना लोंढे, कॉन्स्टेबल संतोष पाटील, पोलीस कर्मचारी गोविंद राठोडा, संजय पांढरे , कॅमेरामन संदीप बिराजदरा हे कर्तव्य बजावत होते.
तिकडे कर्नाटक हद्दीत सुद्धा वाहनांची कसून तपासणी होत असून महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात येणारे सर्व खासगी वाहनांचे तपासणी होत आहे. अलीकडे महाराष्ट्रातून कर्नाटक येणारे बारा लाख, तीन लाख इतकी रक्कम व अवैद्ध दारू सापडल्याने त्या राज्याचे कर्मचारी वाहनांचे कसून तपासणी करीत आहे. वाहनधारकाकडून काही कर्मचाऱ्यांनी मामुल घेत असल्याचे वाहनचालक तक्रार करीत आहे याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असे भावना प्रवासी मधून व्यक्त होत आहे.
कर्नाटक सीमेवरती अरविंद भद्रशेट्टी पोलीस कर्मचारी मल्लिनाथ चक्करगी मंजुनाथ तेरनळी होमगार्डचे अब्दुल अन्सारी बसलिंगप्पा आचलेरी व फरीद हे काम करीत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button