गावगाथाठळक बातम्या

Hyderabad: तो काय सीमेवर युद्ध लढून आलाय का..? ; अल्लू अर्जूनच्या अटकेबाबत मुख्यमंत्री रेड्डींची फायर वार , व्हिडिओ समाविष्ट

हैदराबाद (प्रतिनिधी ): ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लु अर्जुनची अटक आणि त्यानंतर लगेचच त्याची अंतरिम जामीनवर सुटका झाली. 

दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद आता राजकारणावरही उमटू लागले आहेत. या अटकेनंतर भाजपानं तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना जबाबदार धरलं. त्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पोलीस त्यांचे काम करत असल्याचे म्हटले होते. मात्र काल सायंकाळी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी या विषयावर सविस्तर भाष्य केलं आहे. तसेच या अटकेचं समर्थन करत असताना मृत महिलेबाबत कुणीही बोलत नसल्याचं म्हटलं आहे.

इंडिया डुटेला दिलेल्या मुलाखतीमध्ये रेवंत रेड्डी म्हणाले, अल्लू अर्जुन कोणतीही पूर्वकल्पना न देता ४ डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये आला होता. त्यामुळं एकच गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली. त्यात ३९ वर्षीय महिला मृत्यूमुखी पडली असून तिचा लहान मुलगा कोमामध्ये आहे. अल्लू अर्जुन थिएटरमध्ये येऊन सिनेमा पाहून गेला असता तरी काही हरकत नव्हती. पण त्याने ग्रँड एंट्री घेतली. गाडीच्या सनरुफमधून बाहेर येत तो लोकांना हातवारे करत होता, त्याच्या चाहत्यांना अभिवादन करत होता. यामुळे लोक नियंत्रणाच्या बाहेर गेले.

अल्लू अर्जुनच्या अटकेचं समर्थन करत असताना रेवंत रेड्डी पुढे म्हणाले, ‘सगळे लोक त्याच्या अटकेबद्दल बोलत आहेत. पण चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं काय? तिचा मुलगा अजूनही कोमात आहे, तो बरा झाल्यानंतर त्याची आई कुठंय हे विचारेल, तेव्हा त्याला काय सांगायचं?अल्लू अर्जुनने चित्रपट बनवला आणि पैसे कमवले. त्याच्याशी सामान्य माणसाचे काहीच देणंघेणं नाही. अल्लू अर्जुननं सीमेवर जाऊन देशासाठी युद्ध केलं आहे का? मग त्याचा एवढा गवगवा कशासाठी?’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button