धर्माचरणातून भक्तीमार्ग दाखविणारे केंद्रबिंदू म्हणजे वटवृक्ष मंदिर – न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे
न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांचा सत्कार करताना महेश इंगळे व इतर दिसत आहेत.

धर्माचरणातून भक्तीमार्ग दाखविणारे केंद्रबिंदू म्हणजे वटवृक्ष मंदिर – न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे

(Shrishail Gavandi. अ.कोट. दि.२७/०४/२०२५) – आजच्या आधुनिक युगात भौतिक सुखाच्या शोधात मानसिक शांतीपासून परावृत्त होत असलेल्या मानवी जीवनास आध्यत्मिकतेतून व धर्माचरणातून भक्तीमार्ग दाखविणारे केंद्रबिंदू म्हणजे स्वामी समर्थांच्या वास्तव्याने व पदस्पर्शाने पावन झालेले येथील वटवृक्ष मंदिर असून स्वामींचे हे वटवृक्ष मंदिर हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असल्याचे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच वटवृक्ष मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन व आशिर्वाद घेतले असता वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांनी मंदिर समितीच्या वतीने राबविण्यात येणारे विविध धार्मिक कार्यक्रम व उपक्रम हे भाविकांना प्रेरणादायी, व मार्गदर्शनपर आहेत. येथे येणाऱ्या भाविकांकरीता हे स्तुत्य कार्य असल्याचे प्रतिपादनही यावेळी केले. याप्रसंगी अक्कलकोटचे न्यायाधीश मुकुल कल्याणकर, स्वप्निल मोरे, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, दिपक स्वामी, गिरीश पवार, प्रा.शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, संतोष पराणे, सागर गोंडाळ, स्वामी लोणारी, श्रीशैल गवंडी, नरेंद्र शिर्के, संतोष जमगे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांचा सत्कार करताना महेश इंगळे व इतर दिसत आहेत.
