गावगाथा

मराठी भाषेचे सांस्कृतिक संचित दिवाळी अंक यावर्षी सातासमुद्रापार

४८ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा - प्रदर्शन

# मराठी भाषेचे सांस्कृतिक संचित दिवाळी अंक यावर्षी सातासमुद्रापार

# ४८ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा – प्रदर्शन

दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित. दिवाळीतील फराळ, व फटाके दोन दिवसांत संपत असले तरी अंकांच्या निमित्ताने दिवाळीची आठवण वर्षभर ताजी राहते. आजच्या काळाचे प्रतिबिंब त्यामध्ये पडलेले असते. आशा-आकांक्षा, साद-पडसाद व ध्येय – स्वप्ने यांची अपेक्षापूर्ती करण्याचे वार्षिक काम उत्सवी स्वरूपात दिवाळी अंकांच्या माध्यमातून पहिल्या मनोरंजन दिवाळी अंकापासून होत आले आहे. सर्वसामान्य वाचकांना चौकस व बहुश्रुत करीत असतात. त्याचप्रमाणे सुजाण रसिक जणांची अभिरुची संपन्न करीत असतात. ११४ वर्षाची मराठी भाषेची ही वैभवशाली “दिवाळी अंक” परंपरा मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून गेली ४८ वर्षे निरंतर जोपासत आली आहे. यावर्षी वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मराठी भाषेचा परंपरेचा हा ठेवा संस्थेच्या वतीने यावर्षी महाराष्ट्रात मुंबई-ठाणे यासह बृहन्महाराष्ट्रात मध्य भारतात इंदूर आणि परदेशात अमेरिका लॉस एन्जेलिस येथे सातासमुद्रापार पोहोचविणार आहे. मध्यप्रांतातील मराठयांचे राज्य असलेल्या माळवा प्रांतात इंदूर येथील १०९ वर्षाची म्हणजे १९१५ मध्ये स्थापन झालेली “महाराष्ट्र साहित्य सभा” इंदूर, ग्वाल्हेर देवास येथील मराठी भाषिक प्रेमींसाठी दिवाळी अंकांचे प्रदर्शन आयोजित करणार आहे तर या उपक्रमात अमेरिकेतील लॉस एन्जेलिस येथे MCF Foundation – मराठी कल्चरल अँड फेस्टिव्हल marathicultureandfestivals.com ही संस्था पारितोषिके घोषित करून सहभागी होत आहे.MCF च्या वतीने मुंबई आणि इंदूरमधील दोन्ही कार्यक्रम त्यांच्या संपर्कात असलेल्या परदेशातील हजारो मराठी भाषिकांपर्यंत podcast द्वारे पोहोचविणार आहेत.
संस्थेच्या वतीने १९७६ पासून ही स्पर्धा विनामूल्य घेतली जाते. या मान्यताप्राप्त आणि लोकप्रिय स्पर्धेसाठी नेहमीप्रमाणे महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही सर्वाधिक अंक येत असतात. …संपर्क – 9323117704

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button