गावगाथा

बबलाद येथे भोगलिंगेश्वर नूतन मंदिर कलशारोहण व जगद्गुरु अड्डपल्लक्की महोत्सव उत्साहात संपन्न..

काशी जगद्गुरु श्री श्री 1008 डा. मल्लिकार्जुन विश्र्वाराध्या शिवाचार्य भगवत्पाद यांचा अड्डपल्लककी महोत्सव उत्साहात संपन्न झाले.

बबलाद येथे भोगलिंगेश्वर नूतन मंदिर कलशारोहण व जगद्गुरु अड्डपल्लक्की महोत्सव उत्साहात संपन्न..
बबलाद, ता-अक्कलकोट येथे श्री भोगलींगेश्वर नूतन मंदिराचे कलशारोहण आणि लिंग स्थापना व श्री काशी जगद्गुरु डा!!मल्लिकार्जुन विश्र्वारध्य शिवाचार्य यांचा अड्डपल्ल क्की महोत्सव उत्साहात संपन्न झाले.
मंगळवारी सकाळी सहा वाजता भोगलिंगेश्वर लिंगाचे प्रतिष्ठापन परम पूज्य श्री ष. ब्र.जयगुरूषांतलिंगराध्या शिवाचार्य आणि श्री ष. ब्र.संगमेश्वर शिवाचार्य गॉगेहल्ली यांचा वैदिक मंत्रोच्चारात करण्यात आले. दुपारी एक वाजता भोगलिंगेश्र्वर पल्लक्की महोत्सव आणि अग्नि प्रवेश पुरवंत आणि सर्व सद्भक्तांचे उपस्थितीत जयघोषात संपन्न झाले.सायंकाळी चार वाजता गावातील प्रमुख मार्गाने सुहासिनी कुंभ , वाद्य आणि भजन जय घोष करीत काशी जगद्गुरु श्री श्री 1008 डा. मल्लिकार्जुन विश्र्वाराध्या शिवाचार्य भगवत्पाद यांचा अड्डपल्लककी महोत्सव उत्साहात संपन्न झाले. संध्याकाळी सात वाजता श्री काशी जगद्गुरु यांचा दिव्य सानिध्यात आणि सर्व शिवाचाऱ्यांचा उपस्थितीत धर्म सभा आयोजित करण्यात आले. श्री काशी जगद्गुरु यांनी आपल्या आशिर्वचनात सर्व भक्तांनी भारतीय संस्कृती आणि संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यास कुटुंबातील ज्येष्ठांनी आदर्श जीवन जगावे असे आशीर्वाद दिले.सदरील धर्म सभेस तालुक्याचे विद्यमान आमदार श्री सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे व मान्यवर उपस्थित होते. वरील सर्व उत्सव यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत देगाव, सिद्धाराम बोळदे , इरप्पा गुंडद , राजकुमार लकबशेट्टी, सिधू उकली, मधु पुजारी, जीव मड्डी, कल्लप्पा सोमेश्वर,जगु तळवार, आदींनी परिश्रम घेतले. धर्म सभेचे सूत्र संचालन श्रीशैल खानापुरे सर यांनी केले आणि आभार कविधीश रोडगे सर मानले..

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button