*गावगाथा दिवाळी अंकाच्या माध्यमातून ग्रामीण साहित्य व ग्रामीण संस्कृतीचे दर्शन : सरपंच वनिताताई सुरवसे*
गावगाथा दिवाळी अंक भेट
गावगाथा दिवाळी अंकाच्या माध्यमातून ग्रामीण साहित्य व ग्रामीण संस्कृतीचे दर्शन : सरपंच वनिताताई सुरवसे
गावगाथा दिवाळी अंक यंदाचा दुसरे वर्ष असून यावर्षी सुद्धा ग्रामीण संस्कृती, ग्रामीण साहित्य व रूढी परंपरा इतर ऐतिहासिक लेख कथा कविता असे दर्जेदार अंक झाला आहे.गावगाथा दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ वरुन ग्रामीण संस्कृती झलक दिसते.परिपूर्ण व वाचनीय अंक झाला आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावे अशा परिपूर्ण पुस्तक आहे.वाचताना पुन्हा गावखेडयात गेल्याचा भास होतो.अशी प्रतिक्रिया गोंवावचे सरपंच वनिताताई मधुकर सुरवसे यांनी व्यक्त केले.
यावेळी मधुकर सुरवसे, दत्ता नंदे व गावगाथा चे धोंडपा नंदे उपस्थित होते.
या अंकात माहितीपर लेख, ललित लेख, यशोगाथा, कथा, समीक्षा व कविता अशा विविधांगी साहित्याचा समावेश आहे. बारा माहितीपर लेखांमध्ये ‘सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर’ प्रमोद हंचाटे, ‘ग्रामीण भागातील रुढी परंपरा ‘ ज्योती जोगळेकर, ‘स्वामींची संस्था ‘शंभू लिंग अकतनाळ इत्यादी वाचनीय लेखांचा समावेश आहे. नऊ ललित लेखांमध्ये ‘मॉल संस्कृतीतील आठवडे बाजार ‘ धोंडप्पा नंदे, ‘ पुस्तकांचे जीवनातील महत्त्व ‘ मोहन यादव, ‘ कृषी संस्कृती व लोकसंस्कृती जपणूक ‘ संगीता कुलकर्णी इत्यादी लेखांचा समावेश आहे. दहा ललित लेखांमध्ये ‘सोलापूरच्या साहित्य, नाट्य, संगीत, शिल्प आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचाल ‘ पद्माकर कुलकर्णी, ‘मराठवाड्यातून रोजगाराच्या स्थलांतराकडे दुर्लक्ष’ डॉ. सतीश महामुनी, ‘ तर खेडी समृद्ध होतील’ हणमंत पाटील यांचे लेख आहेत. कथा विभागात राजेंद्र भोसले, प्रा. राम सोनवणे, किरणकुमार आवारे इत्यादी लेखकांच्या कथा आहेत, तर प्रवीण दवणे, भारती सावंत, उमेश मोहोळकर, गिरीश दुनाखे इत्यादी कवींच्या कविता अंकात समाविष्ट आहेत.
#गावगाथादिवाळीअंक #धोंडपानंदे