डॉ. रामलिंग पुराणे यांना तेजस फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर
निवडीचे पत्र अभिनेत्री तथा तेजस फाउंडेशनचे अध्यक्षा मेघा डोळस यांनी दि.१९ जुलै रोजी पत्राद्वारे कळविले आहे.

डॉ. रामलिंग पुराणे यांना तेजस फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

मुरूम ता.२८, येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष पत्रकार डॉ. रामलिंग पुराणे यांना तेजस फाउंडेशन नाशिक च्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचे निवडीचे पत्र अभिनेत्री तथा तेजस फाउंडेशनचे अध्यक्षा मेघा डोळस यांनी दि.१९ जुलै रोजी पत्राद्वारे कळविले आहे.

रामलिंग पुराणे हे एका सामान्य कुटुंबात मुरूम शहरातील नेहरू नगर भागात राहणाऱ्या एका उच्च शिक्षित व्यक्तिमत्वाने बसव प्रतिष्ठाणच्या माध्यमातून राज्यातील विविध प्रश्नांना घेऊन विशेष करून होमगार्डच्या प्रश्नासाठी मुंबईत आझाद मैदान, दिल्ली येथील जंतरमंतर मैदान, पुणे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर जनआंदोलन उभे करून त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केला. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न,बेरोजगारांचा प्रश्न असो वा उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील खेडोपाडी जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था पाहून या रस्त्याकरिता शासन दरबारी अनेक निवेदने देणे,आंदोलन करून ते प्रश्न मार्गी लावेपर्यंत सनदशीर लोकशाही पद्धतीने विविध आंदोलने उभी करणे, त्याचा सततचा पाठपुरावा करणे व ते अनुदान प्राप्त करून त्याची अंमलबजावणी होई पर्यंत लक्ष देणे. या त्यांच्या कार्य कुशलते मुळेच त्यांना सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वदूर ओळखले जाते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना दि.१३ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र आमखास मैदान येथे होणाऱ्या तेजस फौंडेशनच्या कार्यक्रमात पत्रकार पुराणे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
