स्वामी भक्तांचा विस्तार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर – अभिनेत्री सुरेखा कुडची
अभिनेत्री सुरेखा कुडची यांचा सहकुटुंब सत्कार करताना प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

स्वामी भक्तांचा विस्तार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर – अभिनेत्री सुरेखा कुडची

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.४/१२/२३) आपला भारत देश हा जसा कृषीप्रधान देश आहे. तसाच भक्तीप्रधान देश आहे. त्यामुळे येथील भाविकांचे अनेक दैवत श्रद्धास्थान आहेत. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची प्रचिती अनेक भाविकांना येत असल्याने श्री स्वामी समर्थांवरही अनेक भाविकांची मनोभावे श्रद्धा आहे, या पाश्वभुमीवर भारताच्या नागरिकांची भक्ती पाहून पश्चिमात्य राष्ट्रातील नागरिक ही स्वामीभक्तीत येत आहेत, याची माहिती
चित्रीकरणाच्या माध्यमातून विविध प्रांतात व विविध राष्ट्रांमध्ये जाण्याचा प्रसंग आल्यानंतर आपल्याला विविध स्तरातून मिळत आहे. ही बाब स्वामी भक्तांकरिता, दत्त सांप्रदाय करिता व अक्कलकोट करिता खूपच आनंदाची बाब आहे, त्यामुळे स्वामी भक्तांचा विस्तार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असल्याचे मनोगत मराठी नाट्य व सिनेसृष्टीतील अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी व्यक्त केले. ते नुकतेच सहकुटुंब येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांनी अभिनेत्री सुरेखा कुडची व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी अभिनेत्री कुडची बोलत होत्या. यावेळी मंदिर समितीचे सेवेकरी गिरीश पवार,प्रसाद सोनार, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, महेश मस्कले, आदिसह भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – अभिनेत्री सुरेखा कुडची यांचा सहकुटुंब सत्कार करताना प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
