गावगाथा

अ. भा. गुरु रविदास समता परिषदजिल्हा संघटकपदी संतोष सुर्यवंशी 

निवड नियुक्ती

अ. भा. गुरु रविदास समता परिषदजिल्हा संघटकपदी संतोष सुर्यवंशी 

उमरी (प्रतिनिधी) : इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरी स्टेशन येथे अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात नांदेड जिल्हा संघटकपदी निवड झाल्याबद्दल संतोष भगवान सुर्यवंशी यांचा यावेळी पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
येथील भगवानराव सुर्यवंशी यांच्या बरबडेकर शूज या दुकानात अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त उमरी येथील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी समाजाच्या विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली.
प्रसिद्धीचा कसलाही बडेजाव न आणता तळागाळातील चर्मकार समाजाच्या विविध प्रश्नांवर तळमळीने काम करणारी संघटना म्हणून अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद ही सामाजिक संघटना सध्या गावपातळीपर्यंत जोरात काम करीत असून आपण सर्वांनी या संघटनेत सामाजिक भावनेतून सक्रीय काम करावे असा ठराव दशरथ सुर्यवंशी यांनी यावेळी मांडला, त्यास सर्वांनी सहमती दर्शवली.
यानुसार उमरी येथील धडाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते संतोष भगवान सुर्यवंशी यांची अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नांदेड जिल्हा संघटक म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. याच बरोबर नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष (ग्रामीण) या पदावर उमरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते गंगाधर प्रकाश गंगासागरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीचे प्रास्ताविक अ. भा. गुरु रविदास समता परिषदेचे नांदेड महानगर कार्याध्यक्ष श्रीनिवास कांबळे यांनी केले तर इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर आणि राहुल खंदारे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस देविदास गंगासागरे, भगवान गंगासागरे, मारोती मारेगावे, साईनाथ सुर्यवंशी आदिंची उपस्थिती होती.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व पेढे भरऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उमरी तालुका कार्यकारिणीचीही यावेळी निवड करण्यात आली. शेवटी युवा कार्यकर्ते सुहास गंगासागरे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button