*केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागणसुर कन्नड मुली शाळेच्या उज्वल यश*
केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या नागणसुर कन्नड मुली विद्यार्थीनी सोबत शिक्षक स्टाफ मार्गदर्शक शिक्षक

*केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागणसुर कन्नड मुली शाळेच्या उज्वल यश*
*अक्कलकोट:-*
जिल्हा परिषद सोलापूर आणि पंचायत समिती अक्कलकोट शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुली शाळेचे मोठागटाचे विविध क्रीडा स्पर्धेत यश संपादन करून उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
नागणसुर येथील एच.जी. प्रचंडे प्रशालेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या मोठागट मुली कबड्डी सांघिक स्पर्धेत प्रथम क्रमांक
पटकावून बीटस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तसेच मोठागट लंगडी स्पर्धेत केंद्र स्तरावर उपविजेतेपद पटकावले आहे .
वयक्तिक स्पर्धा अंतर्गत 100 मी धावणे मोठागट मुली
अंबिका चंद्रकांत मायनाळे (द्वितीय क्रमांक) 200 मी धावणे मोठागट मुली नंदिनी यल्लप्पा खेड (द्वितीय क्रमांक) स्वाती शंकर प्याटी (तृतीय क्रमांक)
बुद्धिबळ मोठागट मुली
दिपाली विठ्ठल बिराजदार
(द्वितीय क्रमांक) पटकावून बीटस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांनीना मुख्याध्यापक मल्लप्पा कवठे क्रीडा प्रमुख शरणप्पा फुलारी,राजशेखर खानापुरे,कल्लय्या गणाचारी,राजशेखर कुर्ले,लक्ष्मीकांत तळवार,शांता तोळणूरे,लक्ष्मीबाई देगांव आदींचे मार्गदर्शन लाभले.
यशवी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे,विस्तार अधिकारी भीमाशंकर वाले,केंद्रप्रमुख गुरुनाथ नरूणे,केंद्रीय मुख्याध्यापक विद्याधर गुरव,केंद्रातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षक बंधू भगिनी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदानंद मठपती,उपाध्यक्ष गजानंद रेवी,सरपंच सुनीता चव्हाण,उपसरपंच धनराज धनशेट्टी सर्व सदस्य, पालक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले आहे.
*फोटो ओळ :-*
केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या नागणसुर कन्नड मुली विद्यार्थीनी सोबत शिक्षक स्टाफ मार्गदर्शक शिक्षक
