सर्वसामान्य परिवारातील वधू-वरांचा विवाह पर्ल गार्डन येथे शाही पद्धतीने मोठ्या थाटामाटात वीरेंद्र हिंगमिरे सोशल फाउंडेशन आणि सक्षम संस्थेच्या वतीने संपन्न झाला….
वीरेंद्र हिंगमिरे फाउंडेशन आणि सक्षम संस्थेच्या वतीने यंदा ५ सर्वसामान्य परिवारातील जोडप्यांचे सामुदायिक विवाह शाही पद्धतीने करण्यात आले
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231216-WA0050-780x470.jpg)
सर्वसामान्य परिवारातील वधू-वरांचा विवाह पर्ल गार्डन येथे शाही पद्धतीने मोठ्या थाटामाटात वीरेंद्र हिंगमिरे सोशल फाउंडेशन आणि सक्षम संस्थेच्या वतीने संपन्न झाला….
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
वधुवरांसाठी तीन मजली राजवाडा पॅलेसचा डेकोरेशन, प्रत्येक पाहुण्यांना बसण्यासाठी आलिशान सोफा, प्रत्येक वधू वर स्टेजवर येण्यासाठी पारंपारिक वेशभूषेतील चालती डोली घेऊन जाणारे मावळे,3000 लोकांसाठी जेवणासाठी डिस्प्ले कॉउंटर,२० बाउन्सर सगळं पाहताना जणू काही एखाद्या आमदार, खासदार,मंत्री किंवा एखाद्या राजघराण्यातील विवाह सोहळा आहे का काय असे दृश्य पाहताना सर्वसामान्य आणि वंचित वधू-वरांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी यावेळी व्यासपीठावर धर्मदाय आयुक्त सुनीता कंकणवाडी, जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह रजपूत, कोल्हापूर येथील एपीआय नागेश मात्रे, ऑल टेन्ट डीलर वेल्फेअर असोसिएशन दिल्ली चे महाराष्ट्र चेअरमन सागर भाई चव्हाण,श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
वीरेंद्र हिंगमिरे फाउंडेशन आणि सक्षम संस्थेच्या वतीने यंदा ५ सर्वसामान्य परिवारातील जोडप्यांचे सामुदायिक विवाह शाही पद्धतीने करण्यात आले होते. वधू-वरास शेरवानी शालू आणि मणी मंगळसूत्र, कपाट इत्यादी वस्तू देण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक वधूस शिलाई मशीन देण्यात आले अशी माहिती सक्षम संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन हुंडेकरी यांनी दिले. विशेष म्हणजे वधू-वरांसह त्यांच्या परिवातील सदस्य चांदीच्या ताटात आणि स्वतंत्र राजवाडा सेट महाल उभा करून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.अधिक माहिती आयोजक वीरेंद्र हिंगमिरे व प्रशांत हिबारे यांनी दिली…
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
शनिवारी सायंकाळी पर्ल गार्डन येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोल ताशांच्या निनादाने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व धर्मीय शाही विवाह सोहळा संपन्न झाला.वीरेंद्र हिंगमिरे सोशल फाउंडेशन व सक्षम सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेला सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे सातवे वर्ष असून विविध सामाजिक संदेश देत तीन हजार वराडी मंडळीच्या साक्षीने हा नयनरम्य शाही विवाह सोहळा पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली.
यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर महेश कोठे, काँग्रेस सेवा दलचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार,चंद्रकांत वानकर,माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, जागतिक लिंगायत महा सभा चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवानंद गोगाव, माजी नगरसेवक जगदीश पाटील चंद्रकांत रमणशेट्टी, उद्योजक सुरेश हत्ती, शशिकांत पाटील,वीरेश उंबरजे, केटरर्स असोसिएशनचे विजयसिंह बघेल,सिद्राम गुब्याडकर, ऍड. भारत आकेन,विनोद जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सद्दाम पटेल,बुद्धा गायकवाड, रावसाहेब सावंत,मनोहर पोतदार,शुभम सराटे,युनूस शेख, मोहन तल्लकोकुल,गोपाळ पवार,महेश मग्रुमखाने,श्रीकांत नसली,सिद्धार्थ कांबळे,आदित्य लालसरे,तात्या शिंदे आदींनी परिश्रम घेतले.