मानवकल्याण, दुःखमुक्त मानव ही संशोधकाची भूमिका असावी :श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने गेल्या महिन्याभरासून सुरू असलेल्या कोर्सवर्क २०२३-२४ च्या समारोपाचे करण्यात आले


मानवकल्याण, दुःखमुक्त मानव ही संशोधकाची भूमिका असावी :श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने गेल्या महिन्याभरासून सुरू असलेल्या कोर्सवर्क २०२३-२४ च्या समारोपाचे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस, प्रमुख पाहुणे म्हणून पुणे उच्च शिक्षण विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य कृष्णा भंडलकर आणि मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे उपस्थित होते. यावेळी दुःखमुक्त मानवता ही संशोधनाची भूमिका असावी, असे प्रतिपादन सबनीस यांनी.

संशोधन हे भावनात्मक नसून बुद्धिवादी आणि विवेचक असायला हवे. संशोधकाची भूमिका नेहमी विनम्र आणि सत्याशी ठाम असावी.
मानवकल्याण, दुःखमुक्त मानव हे त्याचे ध्येय असावे. संशोधनात सगळेच विचार प्रमाण मानू नये. चांगली मुल्ये कधीच संपत नाहीत आणि वाईट मूल्ये टिकत नाहीत असेही यावेळी सबनीस म्हणालेत. शेतकरी का आत्महत्या करतो, या प्रश्नावर सबंध संस्कृती निरुत्तर होते. असेही यावेळी ते म्हणाले.

नेत्याचे चारित्र्य समाज, संस्कृतीवरून ठरते तर समाजाची उंची ही संशोधनावरून ठरत असते. मानवविद्या शाखेकडे स्वतःचे मूल्यत्मकतेचे भांडवल आहे, असे मत डॉ. केशव तुपे यांनी व्यक्त केले. पीएच.डी. संशोधन कोर्सवर्कची भूमिका डॉ. तुकाराम रोंगटे यांनी प्रास्ताविकेत नमूद केली. यावेळी डॉ. अमोगसिद्ध चेंडके, प्रा. तुषार पाटील आणि विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

………………………………….