जेऊर जिल्हा परिषद गटातून कोन्हाळीचे ऍड. सचिन बनसोडे यांच्या उमेदवारीची चाचपणी.
आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूकीसाठीचे दिवस जसजसे जवळ येत आहेत तसतसे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची नाव पुढे येत आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील जेऊर जिल्हा परिषद गट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांचा बालेकिल्ला मनाला जातो तो गट यंदा अनु.जाती राखीव झाल्याने काँग्रेस पक्ष उमेदवारांच्या शोधत आहे. यातच कोन्हाळी गावचे सुपुत्र ऍड. सचिन बनसोडे यांच्या नावाची चर्चा जेऊर जिल्हा परिषद गटात सुरू झाली आहे.
सचिन बनसोडे यांनी अक्कलकोट तालुक्यातील विविध 25 हुन आधिक गावात जवळपास 3 ते 4 कोटी विकास निधी दलित वस्ती, तांडा वस्ती आणि ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत आणून तालुक्यात सत्ताधारी पक्षानंतर आपली वैयक्तिक छाप पाडली आहे. मागील ग्रामपंचायत 2023 निवडणूकित त्यांच्या गावात एक हाती सत्ता आणली आणि वहिनीला उपसरपंच बनवलं.
सचिन बनसोडे हे अक्कलकोट तालुक्यात कायम सक्रिय असतात. प्रकाश आंबेडकर यांनी 2019 साली लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रत्येक गावात जाऊन प्रचार केला आणि वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची सभा आणि दौरा आयोजित केला होता. मागासवर्गीय समाजाने अन्यायाच्या विरोधात अक्कलकोट शहरात काढलेल्या विराट मोर्चाच्या तयारीसाठी त्यांनी गावागावात जाऊन दलित समाजात प्रबोधन केलं आणि सभा यशस्वी करण्यात हातभार लावला. तालुक्यातील अनेक नागरिकांना मुंबई सारख्या ठिकाणी वैद्यकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय अडीअडचणीमध्ये मदत करत असतात यामुळे त्यांची तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. तालुक्यातील वेगवेगळ्या नेत्यांसोबत त्यांचे घनिष्ट संबंध आहेत.
सचिन बनसोडे हे सध्या मुंबईत कार्यरत असून त्यांनी राज्यभर विद्यार्थी आणि कामगारांच्या प्रश्नःसाठी लढाई लढत असतात. माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून महाराष्ट्रात परिचित आहेत.
दिवाळी सणाच्या निमित्ताने सचिन बनसोडे यांनी जिल्हा परिषद गटातील मित्रमंडळी, नातेवाईक आणि आजी-माजी सरपंच, दलित समाजातील नेते, तरुण कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेतल्याचे कळते आहे.
सचिन बनसोडे हे तरुण-तडफदार, आंबेडकरी-पुरोगामी चळवळीत सक्रिय आहेत. छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी केलेल मुंबईत काम प्रभावित करणार आहे. भाजप-RSS जातीवादी सरकारच्या विरोधात मुंबईत वेगवेगळ्या परिषद त्यांनी आयोजित केले आहेत.
माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यासोबत विधानसभा निवडणूकीपूर्वी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत दिल्लीत पक्षप्रवेश केला आहे. म्हणून त्यांचे काँग्रेस पक्षाच्या युवा नेते कन्हैया कुमार, राष्ट्रीय सचिव प्रदीप नरवाल नेत्यांसोबत उठबस आहे. सचिन बनसोडे मल्लिकार्जुन पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. हे सर्व पाहता आणि जेऊर जिल्हा परिषद गटात पारडे जड मानलं जातं आहे. अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस फुटीनंतर ही पहिली निवडणूक होणार आहे. काँग्रेस पक्ष तालुक्यात खूपच कमकुवत झाली आहे.
येत्या निवडणुकीत काँग्रेस नेतृत्व तरुण पुरोगामी चेहऱ्याला संधी देते पुन्हा जुन्या चेहरा शोधते हे बघणे महत्वाचे राहील.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!