बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार विरोधात अक्कलकोट सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
निवेदन

बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार विरोधात अक्कलकोट सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
(श्रीशैल गवंडी, अक्कलकोट)
(दिनांक – १०/१२/२४) –
आज बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार विरोधात संपूर्ण जगभरातून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून अटक करण्यात आले आहे. या घटनेचा व बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचे निषेध म्हणून अक्कलकोट सकल हिंदू समाजाच्या वतीने आज तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बोलताना समाजसेवक तम्मा शेळके यांनी बांगलादेशमध्ये गेल्या ऑगस्ट महिन्यापासून ५० जिल्ह्यातील हिंदू समाजावर अत्याचार होऊन २००० पेक्षा अधिक जातीय हल्ले झाले आहेत. यामध्ये हिंदूंची घरे, हिंदू समाजाचे व्यवसाय, हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावरील हल्ल्याचा समावेश आहे. यादरम्यानच्या हल्ल्यामध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जळून उध्वस्त करून बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे. हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहेत. बांगलादेशमधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेली आहे की हिंदू महिलांवर सामुहिक बलात्कार झाल्याच्या घटनाही पुढे आल्या आहेत. बांगलादेशमध्ये या घटना घडत असताना बांगलादेशचे लष्कर स्वतः त्या अत्याचारांना सहकार्य करीत असल्याचे उघडकीस आले आहे. बांगलादेशातील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्य संस्थाच अल्पसंख्यांक हिंदू वर होत असलेल्या अत्याचारास सहाय्य करताना समोर आल्याने संपूर्ण जगभरातील मानव अधिकार संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. ही कटकारस्थाने थांबविण्याकरिता प्रयत्न नाही झाले तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांगलादेशातील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली. बांगलादेशातील हिंदूंच्या मानव अधिकाराचे संरक्षण करणे आणि मानव अधिकारांच्या बाजूने उभे राहणे आपल्या राष्ट्राच्या आणि राष्ट्रातील नागरिकांचे कर्तव्य आहे. आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंना मानव अधिकारांचे संरक्षण मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आणि मानव अधिकार याला समर्थन करणाऱ्या नागरिकांची आहे. आज आपल्या माध्यमातून सकल हिंदू समाज अक्कलकोटच्या वतीने आम्ही भारतीय राज्य शासनाला आमच्या भावना पोहोचू इच्छितो की बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू संरक्षण समितीची निर्मिती करून आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घ्यावी व अल्पसंख्याक हिंदू हितार्थ योग्य पावले उचलण्याची त्वरित अंमलबजावणी करावी याकरिता अक्कलकोट सकल हिंदू समाजाच्या वतीने आज येथे लेखी निवेदन दिले असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नायब तहसीलदार विकास पवार, भीमराव साठे सर, संतोष वगाले सर, सुशील हिरस्कर, प्रितीश किलजे, संतोष पत्तरगे, ऋषिकेश लोणारी, प्रवीण घाटगे, संजय किणीकर – स्वामी, राहुल वाडे, महेश वागदरे, लखन झंपले, मदन राठोड, गुरु माळी, विजय लांडगे, महेश जोजन, श्रीशैल गवंडी, देविदास गवंडी, प्रसन्न गवंडी, धनराज पाटील, संजय जमादार, काशीद सर, नितीन व्हनोळी, महेश झंपले, अभि बकरे, नागू कलबुर्गी, भाग्येश चुंगीकर, प्रसाद मंगरुळे, अंबादास सुतार आदींसह हिंदू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ – सकल हिंदू समाज अक्कलकोटच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देताना अक्कलकोट सकल हिंदू समाजाचे समाज बांधव दिसत आहेत.
