गावगाथा

संगमेश्वरच्या रविकुमार मोरेची दिल्लीच्या प्रजासत्ताक संचालनासाठी निवड

निवड नियुक्ती

संगमेश्वरच्या रविकुमार मोरेची दिल्लीच्या
प्रजासत्ताक संचालनासाठी निवड

यंदाच्या २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी संगमेश्वर कॉलेजच्या ९ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचा कॅडेट जूनियर अंडर ऑफिसर रवीकुमार बालाजी मोरे याची निवड झाली आहे .जुलै २०२३ पासून जवळपास एकूण १० शिबीरांमधून अत्यंत खडतर प्रशिक्षणातून ही निवड झालेली आहे.
RDC परेडमध्ये निवड होणे ही एनसीसी मधील सर्वात गौरवाची व अभिमानाची बाब असते.आपल्या जिद्द व कष्टाच्या जोरावर राष्ट्रीय संचलनासाठी एनसीसी विभागातील छात्र मोरे याची दिल्ली येथे निवड झाल्याबद्दल संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी , प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा सर,उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक मल्लिकार्जून साखरे तसेच एनसीसी विभागप्रमुख मेजर चंद्रकांत हिरतोट ,कॅप्टन शिल्पा लब्बा , प्रा. तुकाराम साळुंखे यानी त्याचे अभिनंदन केले. तसेच 9 महाराष्ट्र बटालियनचे कर्नल राजा माजी , कर्नल अनिल वर्मा ,सुभेदार मेजर गनबहादुर गुरुंग आणि सर्व पी.आय स्टाफ यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button