गावगाथा

सर्व धर्मांची समानता, संविधान व निसर्गाचे नियम आपल्या देशाच्या अस्तित्वासाठी आणि सन्मानासाठी सर्वांनी पाळलेच पाहिजेत : राष्ट्रीय संत श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज

संदेश

सर्व धर्मांची समानता, संविधान व निसर्गाचे नियम आपल्या देशाच्या अस्तित्वासाठी आणि सन्मानासाठी सर्वांनी पाळलेच पाहिजेत : राष्ट्रीय संत श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज

सर्व धर्मांची समानता, संविधान व निसर्गाचे नियम आपल्या देशाच्या अस्तित्वासाठी आणि सन्मानासाठी सर्वांनी पाळलेच पाहिजेत, जर हे दैवी महामंत्र पाळले नाही तर देशाच्या एकात्मतेवर, एकतेवर आणि अस्तित्त्वावर संकट ओढवेल.असा दिव्य संदेश जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज दिला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथील जय भारतलिंग आणि पालापुर येथील महायुक्तीलिंग येथे मावळते वर्ष आणि नवीन वर्ष यात्रा महोत्सव निमित्त विविध देश भक्ती कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आला. याप्रसंगी तालुका कांग्रेस अध्यक्ष शंकर म्हेत्रे सह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित हेते.यावेळी महाराजांनी आपल्या दिव्य संदेशात सांगितले की,सर्व धर्मांची समानता, निसर्गाचा नियम आणि संविधान जाणून भारतीय म्हणून जगले तर देशाला कोणताही धोका निर्माण होणार नाही.आपण एका धर्मापुरते, जातीपुरते मर्यादित राहू नये. आजच्या परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने जात, पात, पंथ, धर्माचा प्रश्न सोडून प्रथम देशाची भावना आत्मसात आणली पाहिजे. असे शुभ संदेश महाराजानी दिले.भारत देशाचे अस्तित्व सुरक्षित ठेवायचे असेल तर सर्व देशबांधवांनी आपल्यातील मतभेद-भावना-स्वार्थ विसरून देशाचे हित हेच आपले हित समजून घेतले पाहिजे.
वर्तमानाचा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे. १९४७ वर्ष हे स्वातंत्र्य आंदोलनांचे होते, आता २०२३ संपले आणि २०२४ सुरू झाली आहे, लवकरच २०४७ पुन्हा येणार आहे, देशाचे अस्तित्व वाचवण्यासाठी आपण सर्वांनी देशासाठी कष्ट करावे लागतील.देशाचे हित हेच आपले हित, देश हेच आपले घर – देश हे आपले कुटुंब आहे हे जाणून आपण जगलो तर आपल्या भारत देशाला कोणताही धोका येणार नाही.देशासाठी सर्वांनी एकत्र येऊन एका आवाजात हम है भारती, हम है भारती, हम है भारती असे म्हणाले पाहिजे.
जो भारताचे अन्न खातो आणि भारताचे कल्याण करू इच्छित नाही, जो कोणत्याही जातीचा, कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही धर्माचा असो तोच देशद्रोही असतो असे परखड मत राष्ट्रीय संत हवा मल्लिनाथ महाराजानी मांडले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button