गावगाथा

सी. बी. खेडगी वरिष्ठ महाविद्यालय विभाग राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने चपळगांव येथे सात दिवस विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग

  • सी. बी. खेडगी वरिष्ठ महाविद्यालय विभाग राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने चपळगांव येथे सात दिवस विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सी. बी. खेडगी वरिष्ठ महाविद्यालय विभाग राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने चपळगांव येथे मंगळवारी ( दि.२) ते
सोमवारी (दि. ८ ) पर्यंत सात दिवस युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास या ब्रीदवाक्य असलेल्या
विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती
प्राचार्य डॉ शिवराय अडवितोट यांनी दिली.

या शिबिराचे उद्घाटन सोहळा
मंगळवार ( दि. २ ) दुपारी १२ वाजता
माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी यांच्या अध्यक्षतेखाली
गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी
संस्थेचे सचिव सुभाष धरणे, शुगर इंडस्ट्रीचे मॅनेजिंग डायरेक्टर रविकांत पाटील,
साहित्याचे अभ्यासक डॉ. भिमाशंकर बिराजदार, संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, व्हाइस चेअरमन अशोक हारकुड, संचालक अॅड. अनिल मंगरुळे, विद्यापीठाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे,
विभागीय समन्वयक पोपटराव सांबारे, प्राचार्य डॉ. शिवराय अडवितोट, उपप्राचार्य बसवराज चडचण, पर्यवेक्षिका वैदेही वैद्य, सरपंच वर्षा भंडारकवठे
माजी सरपंच उमेश पाटील, कृषीनिष्ठ अप्पासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते अंबणप्पा भंगे उपस्थित राहणार आहेत. तसेच सायंकाळी ७ वाजता जनजागृतीपर मशाल फेरी अक्कलकोट कॉलेजचे नांव दिल्ली पर्यंत पोहोचवणारा एन.एस.एस. विद्यार्थी हालगीवादक राहुल गेजगे याच्या उपस्थितीत होणार आहे.

बुधवारी (दि.३) सकाळी ९ वा. पशु चिकित्सा शिबीर पंचायत समितीचे
पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश मुरुमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दुपारी २ वाजता
शुभदा जेऊरकर यांचे महिलांचे शिक्षण व बालविवाह निर्मूलन या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी संध्या परांजपे,अंगणवाडी पर्यवेक्षिका अश्विनी चटमुटगे उपस्थित राहणार आहेत.

गुरुवारी ( दि.४) सकाळी ९ वाजता नवमतदार जनजागृती व नोंदणी कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ वाजता
डॉ. गणपतराव कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. चन्नवीर भद्रेश्वर मठ यांचे पत्रकार काल,आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान होणार आहे

शुक्रवार (दि.५ )सकाळी ९ वा. महिला मेळावा व आरोग्य तपासणी होणार असून आणि महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य या विषयावर डॉ. साधना पाटील व डॉ. लता रणखांबे यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी संचालिका पवित्राताई खेडगी व संचालिका ज्योती धरणे, सिद्धम्मा कलशेट्टी उपस्थित राहणार आहेत.
दुपारी २ वाजता नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विकसित भारत युवकांचा सहभाग या विषयावर प्राचार्य
डॉ. राजशेखर हिरेमठ यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी ६ वा. डॉ. श्रीकांत पाटील व डॉ. मनिष उंबराणीकर यांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन होणार आहे.
शनिवारी ( दि. ६) दुपारी २ वाजता कवी कट्टा मध्ये करकंब चे प्रा. सतीश देशमुख यांनी मनातील कविता सादर करणार आहेत. रविवारी दिवसभर व्याख्यान व विद्यार्थी – विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. सोमवारी सकाळी गावातून शोभा यात्रा निघणार आहे. सांगता समारंभ सकाळी दहा वाजता होणार आहे. यावेळी तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, प्रा.डॉ. विरभद्र दंडे, प्रा.डॉ. जवाहर मोरे, प्रा. लक्ष्मण राख, सरपंच
वर्षा भंडारकवठे,
संचालक चंद्रकांत स्वामी, श्रीशैल भरमशेट्टी, पोलीस निरीक्षक महेश स्वामी आदि उपस्थित राहणार आहेत.

शिबीर यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. गुरुसिध्दय्या स्वामी, प्रा. सिध्दाराम पाटील आदींनी परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button