पत्रकारावर अन्याय होऊ देणार नाही -वसंतराव मुंडे
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने वसंतराव मुंडे यांचा स्वपत्नीक सत्कार

पत्रकारावर अन्याय होऊ देणार नाही -वसंतराव मुंडे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने वसंतराव मुंडे यांचा स्वपत्नीक सत्कार

अक्कलकोट,प्रतिनिधी
जे सत्य लिहितात, अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडतात आशा पत्रकारांच्या पाठीशी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खंबीरपणे उभे आहे.मोठा दैनिक हातात असले म्हणजे पत्रकार मोठा होत नाही.किती बातम्यांना न्याय दिला, कोणत्या बातम्यांचा पाठपुरावा केला,यावरच त्या पत्रकाराचे मूल्यमापन ठरते असे मराठा राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी म्हणाले..
वसंतराव मुंडे नुकतेच श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले असता.ते पत्रकारासी धावती भेट दिली.त्याप्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास भेट देऊन संस्थेचे विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे व सर्व उपस्थित पत्रकारांच्या वतीने वसंतराव मुंडे यांचा स्वपत्नीक सत्कार करण्यात आले.
पुढे बोलताना वसंतराव मुंडे म्हणाले की,ग्रामीण
पत्रकारावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कायम उभी आहे. तसेच अधीस्वीकृती व शासकीय विविध योजनेचे लाभ मिळवुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शासकीय स्तरावर लढा देत असल्याचे म्हणाले.
यावेळी संघाचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे, सचिव विश्वनाथ चव्हाण,उपाध्यक्ष रमेश भंडारी, दयानंद दणुरे,बसवराज बिराजदार,माजी अध्यक्ष राजेश जगताप,माजी स्वामीराव गायकवाड,समाधान आहिरे,निंगप्पा निंबाळ,रतन राठोड आदी सह उपस्थित होते.
