वागदरी येथे वस्त्र मंत्रालय भारत सरकार व विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्यावतीने हस्तकला विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरुवात:
उत्तम प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा अधीक्षक जयंत मंगलपल्ली..

वागदरी येथे वस्त्र मंत्रालय भारत सरकार व विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्यावतीने हस्तकला विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरुवात: उत्तम प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा अधीक्षक जयंत मंगलपल्ली..


वागदरी/नागप्पा आष्टगी
वस्त्र मंत्रालय भारत सरकार व विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्यावतीने हस्तकला विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करून हातमाग व्यवसायाला बळकटी देण्याचे काम सरकार करीत आहेत. यातून प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांनी 45 दिवसात वेळेवर येवून उत्तम प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे विणकर सेवा केंद्र मुंबईचे अधीक्षक जयंत मंगलपल्ली यानी केले
वागदरी ता अक्कलकोट येथील श्री घाळीदास मंदिर सभागृहात आयोजित 45 दिवशीय प्रशिक्षण शिबीराचे उध्दघाटन करून मंगलपल्ली बोलत होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष बसवराज नडगेरी होते, या वेळी बी एस जाधव, माधव, दत्तात्रय नंजुडे, देवांगप्पा कोणजी, परमेश्वर नंजुडे, शारदाबाई रोटे, लाडफा मड्डे, शरणबसप्पा आष्टगी, नागप्पा आष्टगी, पूजा कोणजी आदी उपस्थित होते,
यावेळी बोलताना मंगलपल्ली म्हणाले की, या प्रशिक्षणातून स्वावलंबी जीवन शक्य आहे, ग्रामीण भागात हातमाग विणकर मोठ्या प्रमाणात आहेत परन्तु आर्थिक द्रष्ट्या मागास असल्याने हातमाग व्यवसाय लोप होत आहे.अशा ठिकाणी वस्त्र मंत्रालय भारत सरकार व विणकर सेवा केंद्र मुंबई यांचा कडून प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण देऊन महिला व पुरुष सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू आहे.अनेक कुटुंबातील लोकांना रोजगार मिळाला आहे ,तरी विणकर बांधवानी या प्रशिक्षण शिबीराचे लाभ घ्यावा असे आवाहन केले,
प्रारंभी वागदरी प्रशिक्षण केंद्राचे केंद्र प्रमुख नागप्पा आष्टगी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले
