जेऊर येथील माजी विद्यार्थी सस्नेह मेळावा आणि 52 सीसीटीव्हीचे लोकार्पण सोहळा संपन्न
आणखी दोन कामे पूर्ण करण्याचा सोडला संकल्प

जेऊर येथील माजी विद्यार्थी सस्नेह मेळावा आणि 52 सीसीटीव्हीचे लोकार्पण सोहळा संपन्न


जेऊर श्री काशिविश्वेश्वर माध्य. व उच्च माध्य. प्रशालेत काल प्रशालेच्या माजी विदयार्थ्यांचा सस्नेहमेळावा आणि त्यांच्याच आर्थिक सहकार्यातून बसवेल्याला 52 सिसीटीव्हीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सुंदर नियोजन, आल्हादादायक वातावरण,आपण प्रशालेत खूप वर्षांनी एकत्र भेटल्याचा आणि आपण प्रशालेच्या आणि श्री काशी विश्वेश्वर मंदिर परिसराच्या सुरक्षेसाठी बसवलेल्या सीसीटीव्हीच्या योगदानात सहभागी झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसला.


यावेळी आमचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबळे साहेब, संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन पाटील, माजी सरपंच शिवाजीराव कलमदाणे, उपसरपंच काशिनाथ काका पाटील,संस्थेचे पदाधिकारी, देवस्थान कमिटी व यात्रा कमिटी सदस्य, ग्रामपंचायत व सोसायटी सदस्य आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.कार्यक्रम प्रसंगी आणि झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया या अतिशय भावस्पर्शी होत्या. संस्थेच्या आणि प्रशालेच्या उन्नतीसाठी सदैव आपले एक हात पुढे राहील याची ग्वाही दिली. एकत्रित फोटो आणि भोजन याने कार्यक्रमाची सांगता झाली.श्री काशिविश्वेश्वर माध्य. व उच्च माध्य. प्रशालेच्या शिक्षक व शिक्षकेतर बांधवानी कार्यक्रमाचे सुंदर व नेटके नियोजन करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. सर्वांनी पुन्हा एकत्र येण्याचा संकल्प सोडत शाळेचा निरोप घेतला.

आणखी दोन कामे पूर्ण करण्याचा सोडला संकल्प
यावेळी आणखी दोन टप्यात तीन वर्गाचे डीजिटल क्लासरूम आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आवश्यक बैठक व्यवस्था, पुस्तके व इतर सोयीसुविधा असणारे ग्रंथालय उभारणे ही दोन कामे येत्या काळात माजी विद्यार्थ्यांच्या सहयोगातून पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला त्याला माजी विद्यार्थ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल असे यावेळी आश्वासीत करण्यात आले.