गावगाथा

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र अक्कलकोट मध्ये शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा

शहरात विविध ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीस पुष्पृष्टी व पुष्पहार घालून नतमस्तक करून स्वागत करण्यात आले.

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी )
*आयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापनाचे अवचित्य साधून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र अक्कलकोट मध्ये शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा सोमवारी संपन्न झाली.*

सदरील शोभा यात्रेचा प्रारंभ श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते श्री राम मूर्तीच्या पूजनाने करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता मल्लिकार्जुन मंदिर ते बस स्थानक, वेताळ चौक, हन्नूर चौक, बुधवार पेठ, कारंजा चौक, मेन रोड, वीर सावरकर, चौक सेंट्रल चौक, फत्तेसिंह चौक, जुना तहसील कार्यालय मार्गे, कमला राजे चौक, ए-वन चौक ते श्रीराम मंदिर येथे शोभायात्रेचे सांगता करून श्रीराम मंदिरात रामभक्त आणि हजारोंच्या संख्येने दीपोत्सव साजरा करण्यात आला.

यासह फत्तेसिंह क्रीडांगण येथे प्रभात ग्रुप, मॉर्निंग ग्रुप, सुप्रभात ग्रुप आदी ग्रुपच्या वतीने क्रीडांगणावर नयना रम्य दीपोत्सव करण्यात आले. या शोभायात्रा प्रसंगी चौका चौकात पुष्पवृष्टी गुलालाचे उधळण, प्रसाद वाटप, महाप्रसाद आदीचे वाटप राम भक्ताकडून करण्यात आले.

या शोभायात्रे प्रसंगी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमानच्या वेशात लहान मुलांनी शोभायात्रेत सहभागी झाले होते. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय राम जयघोषाने परिसर दुमदुमून गेले होते. शोभायात्रेत ढोलीबाजा, सनई, चौघडा फटाक्यांची आतषबाजी गुलाल व फुलांची मुक्त उधळण करण्यात आली.

शोभा यात्रेच्या मार्गावर ब्रह्मांड ग्रुपच्या वतीने विविध रांगोळी काढण्यात आले होते. वटवृक्ष श्री स्वामी समर्थ देवस्थान स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ एक मुखी दत्त मंदिर कालिका मंदिर खंडोबा मंदिर हत्याचा मारुती मंदिर गुरु मंदिर राजाराम मठ समाधी मठ यज्ञ नगरी शिवपुरी येथे दीपोत्सव करण्यात आले.

या आदी सकाळी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ देवस्थानच्या अधिपत्याखाली असलेली श्री राम मंदिर येथे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राम मंदिर येथे भजन, कीर्तन महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. शांभवी कल्याणशेट्टी, संस्थानिक मालोजीराजे भोसले, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, प्रथमेश इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, संतोष पराणे आप्पासाहेब पाटील, प्रथमेश इंगळे, रमेश कापसे, मल्लिनाथ मजगे, मल्लिनाथ स्वामी, बाबुराव कुलकर्णी, संतोष वघाले, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, दिनेश पटेल, राजकुमार हिप्परगी, महेश हिंडोळे, शिवशरण वाले, दयानंद बिडवे, आनंद तानवडे, यशवंत धोंगडे, राजकुमार बंदीछोडे, नीलकंठ कापसे, प्रशांत लोकापुरे, शिवराज स्वामी, अशोक येणगुरे, राजशेखर कापसे, ह.भ.प वीरपाक्ष वैरागकर, रवी जोशी, दीपक जरीपटके, एम.बी पाटील, श्रीकांत झिपरे, राजू एकबोटे, बाबा सुरवसे, सत्यजित लोके, प्रशांत शिंपी, ऋषी लोणारी, अभिजीत लोके, वैजनाथ मुखडे, सिद्धाराम माळी, विश्वनाथ देवरमणी, रवी वाघमोडे, शरणो कापसे, सुनील गवंडी, प्रकाश पाटील, बंटी राठोड चंद्रकांत दसले अंकुश चौगुले संजय भागानगरे संजय राठोड, सिद्धाराम टाके, बालाजी पाटील, अप्पी उमराणीकर, प्रसन्न हत्ते, विशाल दोशी, धनंजय गडदे, सुशील हिरस्कर, बाळा शिंदे, श्रीधर गुरव, संदेश उमराणीकर, नागेश कलशेट्टी, संजय पाटील, खंडो करके, चेतन साखरे, गुरुपाद आळगी, विकास तळवार, प्रदीप हिंडोळे, सुरज पोद्दार, प्रथमेश पवार, नागराज कुंभार, चेतन शिंदे, राजू पुकाळे, महेश पाटील, नागेश ताडमार यांच्यासह शेकडो महिला शोभा यात्रेत सहभागी होऊन जय श्रीरामाचे जयघोष करण्यात आले. या शोभायात्रे प्रसंगी शहरात विविध ठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीस पुष्पृष्टी व पुष्पहार घालून नतमस्तक करून स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button