भाग्यवंती देवी प्रकट दिन व पाळणा कार्यक्रम विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे संपन्न
अक्कलकोट: प्रतिनिधी
वागदरी येथील जागृत भाग्यवंती देवीची नयनरम्य पाळणा कार्यक्रम यासह विविध कार्यक्रम घेण्यात आले कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेले भाग्यवंती देवस्थान जागृत व नवसाला पावणारी म्हणून ओळखली जाणारी श्री भाग्यवंती देवीची नयन रम्य व भव्य दिव्य असा पाळणा कार्यक्रम हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्री भाग्यवंती देवी प्रकट दिन व पाळणा कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. 23 जुलै रोजी रात्री भजन भारुड कीर्तन या कार्यक्रमाने जागरण करण्यात आला. दिनांक 24 जुलै गुरुवार रोजी पहाटे श्री भाग्यवंती देवीच्या मूर्तीस महारुद्र अभिषेक त्यानंतर नवग्रह पूजा दाम्पत्य पूजा, महारुद्र अभिषेक पूजा व होम हवन तदनंतर दुपारी एक वाजता हजारो भक्तगणांच्या व सुवासिनीच्या उपस्थितीत नयनरम्य भव्य दिव्य असा पाळणा कार्यक्रम व प्रकट दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम ष नि प्र शिवलिंगेश्वर महास्वामी वीरक्त मठ वागदरी यांच्या आशीर्वादाने व दिव्य सानिध्यात पार पाडण्यात आला. सदर कार्यक्रमास हन्नूर गावाचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी व शेळके प्रशालाचे चेअरमन बसवराज शेळके, गोगावचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, प्रदीप जगताप सुनील सावंत शानपा मांगाणे, या मान्यवरांनी उपस्थित राहून शोभा वाढवली. सदर पाळणा व प्रकट दिन कार्यक्रमास महाराष्ट्र कर्नाटक मराठवाडा मुंबई पुणे सह पंचक्रोशीतील हजारो भक्त गणांनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री भाग्यवंती देवी चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष काशिनाथ पोमाजी, सिद्धाराम यमाजी, सुरेश सावंत,मल्लिनाथ परीट, बसवराज पोमाजी, रुद्रप्पा हुगे , महादेव सरसंबी, श्याम बाबर, महादेव सोनकवडे सह गावकऱ्यांनी परिश्रम घेतला उपस्थित सर्व भक्तांना महाप्रसादाची सोय करण्यात आला होता
चौकट
यावेळी महाप्रसादाचे नियोजन चांगल्या प्रमाणे करण्यात आले होते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यंदा पहिल्यांदाच सागर दादा कल्याणशेट्टी युवा मंच वतीने वागदरी ते भाग्यवंती देवी मंदिर परत वागदरी पर्यंत मोफत वाहन ठेवण्यात आले होते यांची सर्वत्र कौतुक होत आहे सर्व चालक मालक यांचे सागर दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते भाग्यवंती देवी चरिटेबल ट्रस्ट वतीने सन्मान करण्यात आले
Back to top button
×
No WhatsApp Number Found!