
निवडणूक जागरूकता कार्यक्रम…

उप निबंधक, सहकारी संस्था, ‘N’ वॉर्ड चे श्शिरीष सपकाळ यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था 2 यांचे मार्गदर्शक पत्रा नुसार सिंधुवाडी, घाटकोपर पूर्व, फेअर लाईफ सोसायटी सभागृहात निवडणुकीच्या वेळी मतदारांच्या सोयी करीता मोठया सहकारी संस्थाच्या परिसरात मतदान केन्द्र निर्माण करण्याकरिता त्यांच्या संस्था पदाधिकाऱ्यांना सहकार्याचे आवाहन व मार्गदर्शन केले. घाटकोपर चे निवडणूक अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी स्वप्नील तांगडे व सहकार आणि महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती, मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदान केंद्रावरील गर्दी/रांगा नियंत्रणात आणण्यासाठी अशाप्रकारे मोठया सोसायट्यांचे आवारात सदर मतदान केन्द्र उभारण्यास परवानगी द्यावी व निवडणूक मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आवाहन स्वप्नील तांगडे यांनी सर्व उपस्थीत सहकारी संस्था पदाधिकाऱ्यांना केले व त्याकरिता अर्ज करण्याची पद्धत समजावून सांगितली, शिरीष सपकाळ व स्वप्नील तांगडे साहेब यांनी बरेचसे शंका निरसन केल्यावर संस्था पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यानंतर मुंबई जिल्हा सहकारी हौसिंग फेडरेशन संस्थेचे संचालक अजय बागल यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
