गावगाथा

मातोश्री गंगाबाई माधवराव पाटील यांची ३ री पुण्यतिथी साजरी

माधवराव पाटील महाविद्यालयात मातोश्री गंगाबाई पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना अशोक सपाटे, सुरेखा पाटील, अनुराधा जोशी, पुरुषोत्तम बारवकर, महेश मोटे, नागनाथ बनसोडे व अन्य.

मातोश्री गंगाबाई माधवराव पाटील यांची ३ री पुण्यतिथी साजरी

मुरुम, ता. उमरगा, ता. ४ (प्रतिनिधी) : येथील स्व. गंगाबाई माधवराव पाटील यांची रविवारी ( ता. ४) रोजी ३ री पुण्यतिथी श्री माधवराव पाटील महाविद्यालय, प्रतिभा निकेतन विद्यालय व नूतन विद्यालयात साजरी करण्यात आली. स्व. मातोश्री गंगाबाई माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, प्राचार्य महानंदा रोडगे, मुख्याध्यापक सुधाकर वडगावे, मुख्याध्यापिका अनुराधा जोशी, सुरेखा पाटील, प्रा. राजनंदिनी लिमये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर, डॉ. महेश मोटे, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. नरसिंग कदम, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. अविनाश मुळे, डॉ. विलास खडके, डॉ. महादेव कलशेट्टी, डॉ. सोमनाथ बिराजदार, डॉ. दिनकर बिराजदार, डॉ. संध्या डांगे, डॉ. जयश्री सोमवंशी, संगीता देशमुख, धनराज हाळ्ळे, विजयश्री भालेराव, डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. अशोक बावगे, महादेव पाटील, सुभाष पालापूरे, दत्तू गडवे, प्रभाकर महिंद्रकर, मल्लू स्वामी, प्रा. सुदिप ढंगे, किशोर कारभारी, चंद्रकांत पुजारी आदी. प्रतिभा निकेतन विद्यालयात उपमुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, मुख्याध्यापक तात्यासाहेब शिंदे, प्रा. कल्याणी टोपगे, परिवेक्षक विवेकानंद परसाळगे, चंद्रमाप्पा कंटे, प्रा. शोभा पटवारी तर नूतन विद्यालयात पिरप्पा आष्टगे, विश्वनाथ स्वामी, लक्ष्मी पवार आदींची उपस्थिती होती. यावेळी माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरुम, कोथळी, भुसणी व नूतन प्राथमिक शाळा, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, मुरुम आदी विद्यालयातही अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. स्व. गंगाबाई माधवराव पाटील ह्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वर्गीय माधवरावजी (काका) पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील राज्याचे नेतृत्व करीत आहेत. तर
दुसरे चिरंजीव धाराशिव जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील हे सहकार क्षेत्रातून जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचे नातू शरण पाटील हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून राज्यभर युवकांची बांधणी करून युवकांचे संघटन करीत आहेत. या सर्वांना सुसंस्कारित विचार देण्यामध्ये मातोश्री गंगाबाई माधवराव पाटील यांचा सिंहाचा वाटा राहिला असल्याचे मुख्याध्यापक सुधाकर वडगावे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात मातोश्री गंगाबाई पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना अशोक सपाटे, सुरेखा पाटील, अनुराधा जोशी, पुरुषोत्तम बारवकर, महेश मोटे, नागनाथ बनसोडे व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button