गावगाथा

शांतीनिकेतनच्या चिमुकल्यांनी स्नेहसंमेलनात नृत्य सादर करून श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध

शांतीनिकेतन प्राथमिक विद्या मंदिरच्या वतीने कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी शेतकरी गीतावर नृत्य करताना बालकलाकार

शांतीनिकेतनच्या चिमुकल्यांनी स्नेहसंमेलनात नृत्य सादर करून श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध

मुरूम, ता. उमरगा, ता. ४ (प्रतिनिधी) : येथील ज्ञानदान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतीनिकेतन प्राथमिक विद्या मंदिरचा कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी (ता. ३) रोजी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शरणाप्पा मुदकण्णा होते. यावेळी संस्थेचे सचिव सुषमा मुदकण्णा, संचालिका तेजस्विनी मुदकण्णा, बाबासाहेब पाटील, श्रीकांत कारभारी, प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. नितीन डागा, रफिक पटेल, महेश निंबरगे, रामलिंग पुराणे, विजयकुमार देशमाने, मनिष मुदकण्णा, आनंद देशट्टे, वैभव वेल्हाळ, रफिक पटेल महेश निम्बर्गी रामलिंग पुराणे देविदास शिंदे, बालाजी भोसले, शरणाप्पा पाताळे, बिना पोतदार, गुलाब चव्हाण, मोहन राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तेजस्विनी मुदकण्णा व विजयकुमार देशमाने यांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करुन चिमुकल्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी चिमुकल्यांनी शेतकरी गीत, छोटा बच्चा ओ माय फ्रेंड गणेशा, केळेवाली, पुष्पा, मंगलागौरी, रिमिक्स, चाक धूम धूम, देशभक्तीपर फॅन्सी ड्रेस, चंदा चमके चम चम, छान किती दिसते फुलपाखरू, कोळीगीत, लावणी, बाबा मै तेरी मलिका आदि विविध नृत्यांवर ठेका धरून कलागुण सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राजश्री वेल्हाळ, काजल कांबळे, स्वाती महामुनी, प्रिया वेदपाठक, मनिषा निंबरगे, रुपाली शिंदे, सारिका शेळके, वैष्णवी स्वामी, महादेव गिरीबा आदींनी पुढाकार घेतला. संमेलनाचे प्रास्ताविक अब्दुलगनी बागवान यांनी केले. सूत्रसंचालन मनोज बोंदर तर आभार माधवी कलशेट्टी यांनी मानले. यावेळी शहर व परिसरातील पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील शांतीनिकेतन प्राथमिक विद्या मंदिरच्या वतीने कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी शेतकरी गीतावर नृत्य करताना बालकलाकार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button