गावगाथा

कल्याणशेट्टी विद्यालयाची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड..

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कल्याणशेट्टी विद्यालयाने बाजी मारली

कल्याणशेट्टी विद्यालयाची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड..
अक्कलकोट : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कल्याणशेट्टी विद्यालयाने बाजी मारली आहे. कु. वैष्णवी टपाले या मुलीने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक तर 14 वयोगटात पृथ्वीक मुसळे व गायत्री धम्मे या दोघांनी तृतीय क्रमांक मिळवले आहे. तायक्वांदो व कराटे या दोन्ही क्रीडा स्पर्धेत कु. गौरी झिंगाडे या मुलीने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत गौतम शिंगे 57 वयोगटात तालुक्यात प्रथम आला असून सुमित खांडेकर हा 52 किलो वजन गटात तालुक्यात प्रथम आलेला आहे दोघांचीही जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे.
तालुकास्तरीय योग स्पर्धेत 14 वयोगटांमध्ये रोहित कोळी, गौरी कामाटी, गौरी कांबळे, नरेंद्र कालेबत्ते, श्वेता सुतार, तन्मय गोगाव,लक्ष्मी कणगी, भक्ती मुराडे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे तर 17 वयोगट योग स्पर्धेत वीरेंद्र जोजन, तन्मय गोगाव, विनायक पाटील, दर्शना कोकरे, भक्ती कामाठी, आयेशा शेख,सिध्दी बाबर या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे. 19 वयोगटांमध्ये साजिया शेख, रंजना अंबुरे, वैशाली गवळी, श्रद्धा त्रिगुळे, भाग्यश्री पाटील या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. सर्व यशस्वी खेळाडूंचे तसेच मार्गदर्शक शिक्षक कुमार जाधव, चंद्रकांत बिराजदार व श्रीशैल बिराजदार यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन कल्याणशेट्टी, संस्थेचे संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संस्थेच्या संचालिका शांभवी कल्याणशेट्टी, संचालक मल्लिकार्जुन मसुती, ज्युनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सेमी विभागप्रमुख रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, दिगंबर जगताप यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button