Akkalkot : अक्कलकोट येथील हजरत शेख नूरुद्दीन चिस्ती रहि, यांच्या उरूसाला २१ऑगस्ट पासून प्रारंभ

अक्कलकोट (प्रतिनिधी): अक्कलकोट शहरातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हजरत शेख नूरुद्दीन चिस्ती रहि, उरूस शरीफ दिनांक २१ ऑगस्ट (बुधवार) पासून प्रारंभ होत आहे.

दिनांक २१ ऑगस्ट (बुधवार) रोजी रात्री ठीक दहा वाजता दर्गाचे सज्जादानशीन सय्यदशा नसीरपाशा पिरजादे चिस्ती यांचे पवित्र हस्ते हजरत शेख नुरुद्दीन बाबा मजार(दर्गा) चे गुसुल (अभिषेक) ह्या धार्मिक विधीने उर्ससास सुरुवात होणार आहे.

हजरत शेख नुरुद्दीन चिस्ती यांचा ऊस तीन दिवस चालणार आहे.

दि.२२ ऑगस्ट (गुरुवार) रोजी संदल (गंध), दि.२३ ऑगस्ट शुक्रवार रोजी चिराग (दीपोत्सव), दि.२४ ऑगस्ट शनिवार रोजी ज्यारत(प्रसाद वाटप) होणारं आहेः

दि.२२ऑगस्ट (गुरुवार) रोजी संदल गंध संध्याकाळी ७:०० वाजता अक्कलकोट शहरातील रजिअल्ल्हा दर्गाह येथून निघून अक्कलकोट शहरातील ए वन चौक, विजय कामगार चौक कारंजा चौक मेन रोड फत्तेसिंह चौक बेडर कन्हैया चौक या प्रमुख मार्गावरून गंध मिरवणूक निघून रात्री ठीक १०:० वाजता हजरत शेख नुरूद्दीन बाबा चिस्ति दर्गा येथे पोहोचणार आहे.
त्यानंतर सदर दर्गाहचे सज्जादानशीन यांचे हस्ते हजरत शेख नुरुद्दीन बाबां यांचे समाधीवर संदल (गंध) चढविण्यात येईल व त्यानंतर प्रसाद वाटप होणार आहे.
दि.२३ ऑगस्ट शुक्रवार उर्सच्या मुख्य दिवस रोजी चिराग (दिपोस्तव) चा कार्यक्रम सदर दर्गाहचे सज्जादानशीन सय्यदशा नसीरपाशा सय्यदशा कदीरपाशा पीरजादे चिष्ती यांचे पवित्र हस्ते होणार आहे. संध्याकाळी दर्गायेथे कव्वाली,(कलाम,भजनाचा)बहारदार कार्यक्रम होणार आहे.
दि.२४ ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी १०:०० वाजता जियारत कार्यक्रम संपन्न होणार आहे व त्यानंतर सज्जादानशीन यांचे हस्ते प्रसाद वाटप होणार आहे. प्रसाद वाटपानंतर संध्याकाळी दर्गाहची परंपरागत गादी फातेहाखानी नंतर सज्जादानशीन यांचे दर्गाह येथील निवास्थानी नेऊन ठेऊन ऊर्स शरीफची सांगता होणार आहे.
अक्कलकोट शहरातील व तालुक्यातील सर्व हिंदु-मुस्लिम बांधवांनी व सद भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हजरत शेख नुरुद्दीन बाबा चिस्तीचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान ट्रस्टचे सज्जादनशीन नासिर पाशा पिरजादे व ट्रस्टचे अध्यक्ष हाजी फजलेरहिमान शादी शाब्दी यांनी केले आहे.