गावगाथा

गोपाळवाडी गावचे मा तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

पुरस्कार सन्मान

गोपाळवाडी गावचे मा तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल होले राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

दौंड तालुक्यातील गोपाळवाडी येथील पत्रकार गावचे भूषण मा तंतमुक्ती अध्यक्ष श्री विठ्ठल अनंता होले यांना ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.ज्ञान संकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. बुधवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी दौंडच्या प्राईम स्केवर येथील सभागृहात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल होले यांना हा पुरस्कार देण्यात आला.विठ्ठल होले यांना यापूर्वी सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत,रक्तदान शिबिर,सांस्कृतिक कार्यक्रम,महिला सन्मान सप्ताह,सर्व महपुरूषांच्या जयंती उत्सव ग्रामपंचायत मध्ये एकत्र साजरी करण्या सारखे समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत, कोरोना काळात केलेले काम यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील,पोलीस,ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसभेत सत्कार करण्यात आला आहे, तंटामुक्ती अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात गावातच तंटे मिटविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ दौंड यांच्या वतीने शांतीदुत आदर्श तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून सन्मानित करण्यात आले आहे,यासाठी विठ्ठल होले यांना दौंड पोलीस स्टेशनचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे विठ्ठल होले यांनी सांगितले आहे,
यावेळी ज्ञान संकल्प सामाजिक संस्थेचे प्रमुख सदाशिव रणदिवे, वैशाली रणदिवे,नामदेव बापू ताकवणे ( सरचिटणीस ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार,श्रीनाथ ननवरे दौंड शहर शिवसेना प्रमुख,प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ प्रेमकुमार भट्टड,प्रसिद्ध रील स्टार हर्षदा जाधव,गोपाळवाडी गावच्या सरपंच सौ निता गिरमे, पाटस गावच्या सरपंच सौ तृप्ती भंडलकर,ऍड सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते,हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल विठ्ठल होले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button