शाळा महाविद्यालयातून भित्तीपत्रकांचे प्रकाशन व्हावे – मल्लीनाथ कल्याणशेट्टी
विवेक, अर्थार्जन व अग्निपंख या भित्तिपत्रकांचे प्रकाशन करताना मान्यवर
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240218-WA00681-780x454.jpg)
शाळा महाविद्यालयातून भित्तीपत्रकांचे प्रकाशन व्हावे – मल्लीनाथ कल्याणशेट्टी
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट – भ्रमणध्वनी, इंटरनेट मुळे लेखन कला, चित्रकला यांचा विकास थांबला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेस बाधा पोहचत आहे. त्यासाठी शिक्षकांनी शाळा महाविद्यालयातून भित्तिपत्रकांचे प्रकाशन करावे असे मत मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात विवेक, अर्थार्जन, अग्निपंख या भित्तिपत्रकांचे प्रकाशन केल्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी विज्ञान विभाग प्रमुख पूनम कोक्कळगी या होत्या. व्यासपीठावर प्राचार्य. डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
पुढे ते म्हणाले कि विद्यार्थ्यांकडून लेख, कथा, कविता, लिहून घेण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील प्रतिभेस जाणीवपूर्वक चालना देण्याचा शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
पूनम कोक्कळगी म्हणाल्या कि शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखावेत. त्यांच्यातील सृजन शक्ती जागरूत करावी. उपक्रम आयोजित करावेत. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण होण्यास मदत होईल.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य. डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शीतल झिंगाडे यांनी केले तर आभार गुरूशांत हपाळे यांनी मानले. यशस्विते साठी प्रा. राजशेखर पवार, प्रा. तुकाराम शिंदे, डॉ. बाळासाहेब पाटील, प्रा. विद्या बिराजदार, प्रा. शीतल फुटाणे, प्रा. मनीषा शिंदे, प्रा. विद्याश्री वाले, विठ्ठल एलगर, महेश जोगदे यांनी प्रयत्न केले.
चौकटीतील मजकूर – विवेक अर्थार्जन व अग्निपंख भित्तिपत्रकाचे झाले प्रकाशन
कला विभागाच्या वतीने विवेक भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचे संपादन प्रा. तुकाराम शिंदे यांनी केले, वाणिज्य विभागाचे अर्थार्जन भित्तीपत्रकाचे संपादन प्रा. शीतल फुटाणे तर विज्ञान विभागाच्या अग्निपंख या भित्तीपत्रकांचे संपादन प्रा. मनीषा शिंदे यांनी केले. या भित्तीपत्रकात कथा कविता चारोळी, राज्य व केंद्र सरकारच्या बजेट विश्लेषण तसेच विज्ञान विषयक घडामोडी आदींचा समावेश आहे.
फोटो ओळ – विवेक, अर्थार्जन व अग्निपंख या भित्तिपत्रकांचे प्रकाशन करताना मान्यवर