सौ सुरेखा कल्याणशेट्टी विद्यालयात किशोरवयीन मुलीना मार्गदर्शन ..
मनिषा शिंदे, कल्पना स्वामी, निशिगंधा कोळी,विद्या बिराजदार, सलोनी शहा आदी महिला शिक्षका व बहुसंख्य विद्यार्थीनी उपस्थित होते..
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/02/IMG-20240217-WA00741-780x470.jpg)
सौ सुरेखा कल्याणशेट्टी विद्यालयात किशोरवयीन मुलीना मार्गदर्शन ..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट : महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक मराठी व सेमी इंग्रजी विद्यालयात इ. 5 वी ते 12 वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना आरोग्य व शारीरिक स्वच्छता या विषयी माहिती व्हावी म्हणून अक्कलकोट येथील नामवंत महिला डॉक्टर सौ भाग्यश्री मद्री- बनसोडे यांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी संचालिका सौ शांभवी कल्याणशेट्टी, सीइओ सौ रूपाली शहा,ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख सौ पूनम कोकळगी हे उपस्थित होते. वयात येणा-या मुलीना आरोग्य व शारीरिक स्वच्छता या बाबत शालेय स्तरावर समुपदेशन करण्याची गरज असल्याचे मत डाॅ. सौ. बनसोडे यानी व्यक्त करून शिबीरातील सर्व मुलीना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी मनिषा शिंदे, कल्पना स्वामी, निशिगंधा कोळी,विद्या बिराजदार, सलोनी शहा आदी महिला शिक्षका व बहुसंख्य विद्यार्थीनी उपस्थित होते..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)