केडगाव आरोग्य केंद्रात ‘फिटनेस सर्टिफिकेट’ सुविधा सुरू करण्याची मागणी ;
गटविकास अधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने निवेदन
केडगाव, ता. दौंड : केडगाव आरोग्य उपकेंद्रामध्ये फिटनेस सर्टिफिकेट देण्याची सुविधा सुरु करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दौंड तालुका उपाध्यक्ष श्री. प्रदेश ज्ञानदेव शेलार यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती दौंड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
केडगाव-चौफुला हा परिसर दौंड तालुक्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखला जातो. येथे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे स्थापन झाले असून नागरिकांची वर्दळही मोठ्या प्रमाणात आहे. केडगाव चौफुला हे तीस ते पस्तीस गावांचे केंद्र बनले आहे.
मात्र, नागरिकांना फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी सध्या यवतला जावे लागते, जे वयोवृद्ध, महिला, शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी ही सुविधा केडगाव आरोग्य उपकेंद्रामध्ये उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी श्री. शेलार यांनी निवेदनाद्वारे केली असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असेही ते म्हणाले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!