स्वामींच्या वास्तव्यामुळे वटवृक्ष मंदीराचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय – मा.आमदार महादेव बाबर
मा.आमदार महादेव अण्णा बाबर यांचा वटवृक्ष देवस्थान मध्ये सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

स्वामींच्या वास्तव्यामुळे वटवृक्ष मंदीराचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय – मा.आमदार महादेव बाबर

(अक्कलकोट,दि.१०/०२/२५)
(श्रीशैल गवंडी) – स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांप्रमाणे माझ्या कुटूंबियांसह मलाही श्री. स्वामी समर्थांच्या जागृततेची व त्यांच्या कल्पनाशक्तीची प्रचिती आली आहे. यामुळे जीवन स्वामीमय झाले आहे. माझ्यासह अनेक भाविकांच्या जीवनात स्वामी भक्तीला अग्रस्थान असल्याने माझ्या सह तमाम स्वामी भक्तांच्या भक्तीतून स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व स्वामींच्या वास्तव्यामुळे तिर्थक्षेत्र अक्कलकोटचा व वटवृक्ष मंदीराचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय होत असल्याचे मनोगत पुणे हडपसरचे मा.आमदार महादेव आण्णा
बाबर यांनी केले. ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी मा.आमदार
महादेव आण्णा बाबर यांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला यावेळी मा.आमदार बाबर बोलत होते. त्यांच्या समवेत असलेले स्वामी भक्त माऊली भोईटे व कांता भाडळे, रवी गायकवाड यांचाही याप्रसंगी महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, दर्शन घाटगे, श्रीशैल गवंडी, सचिन हन्नूरे, विपूल जाधव इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – मा.आमदार महादेव अण्णा बाबर यांचा वटवृक्ष देवस्थान मध्ये सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
