गावगाथा

*सोलापूर पोलीस आयुक्तालयाची धडाकेबाज कामगिरी*

मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या सर्व अधिकारी व अमंलदार यांचं पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी अभिनंदन केलं आहे.

*सोलापूर पोलीस आयुक्तालयाची धडाकेबाज कामगिरी*

सोलापूर : मिसिंग व्यक्तींचा शोध घेण्याकामी, सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयतर्फे ०७ ते १७ फेब्रुवारी दरम्यान विशेष शोध मोहिम राबवण्यात आली आहे. मिसिंग तपासासाठी ऑपरेशन मुस्कान तसेच विशेष शोध मोहिम नुकतीच राबविण्यात आली. या मोहिमेत विविध पोलीस ठाण्याकडील बेपत्ता नोंद असलेल्या ४९ पुरुष, ३७ महिला व १८ वर्षाचे व्यक्तीसोबत गेलेले ०६ बालकांचा शोध पोलीस आयुक्तालयाला यश आलं आहे. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दिपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रांजली सोनवणे व पोलीस निरिक्षक महादेव राऊत (अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ १० दिवसात ०७ पोलीस ठाणे हद्दीत विशेष मोहिम (Special Drive) दरम्यान ०८ तपास पथके तयार करून सदर पथकाकडून विशेष शोध मोहिमेत हरविलेल्या ९२ व्यक्ती (ज्यात -४९ पुरुष, ३७ महिला व १८ वर्षाचे व्यक्तीसोबत गेलेले ०६ बालके) चा शोध घेऊन त्यांना त्यांच्या नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले.
यावेळी नातेवाईकांनी आनंद व्यक्त करताना, पोलीसांचं आभार मानलंय. पोलीस स्टेशन स्तरावर इतर गुन्ह्याचा तपासामुळे मिसिंग तपास संथ होतो. शिथिलता येते पण या शोध मोहिमेत सातत्य राहण्याकरिता विशेष शोध मोहिम घेण्यात आली. ती यशस्वी ठरली. एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं. ४९/२०२४ अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ६ सह भादंवी कलम ३७०(अ) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करून एका पिडीत महिलेची सुटका केली. यापूर्वी ऑपरेशन मुस्कान राबविण्यात आले, त्यात १३४ महिला व १३ अल्पवयीन बालकांचा शोध घेण्यात आला. माहे जानेवारी २०२४ मध्ये विशेष शोध मोहिमेंतर्गत १३८ बेपत्ता व्यक्ती व १ बालिकेचा शोध घेण्यात आला. याप्रमाणे “विशेष शोध मोहिम (Special Drive) ” ही मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या सर्व अधिकारी व अमंलदार यांचं पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी अभिनंदन केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button