गावगाथा

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिव छत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने जय भवानी…! जय शिवराय…!! च्या जयघोषात शिवजन्मोत्सवाची सांगता..*

मिरवणुकीत अमोलराजे भोसले मित्र मंडळाचे ३०० युवकांच्या लेझीम पथकाचा खेळ लक्षवेधी ठरले..!*

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिव छत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने जय भवानी…! जय शिवराय…!! च्या जयघोषात शिवजन्मोत्सवाची सांगता..*

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

मिरवणुकीत अमोलराजे भोसले मित्र मंडळाचे ३०० युवकांच्या लेझीम पथकाचा खेळ लक्षवेधी ठरले..!

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

बुधवारी सायंकाळी ६ वा. शिव छत्रपतींची भव्य मिरवणूक आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृह राज्यमंत्री  सिद्धाराम म्हेत्रे, शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख अमोल (बापू) शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावार, सो.म.पा.माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत घाडगे, माजी शिक्षण सभापती संकेत पिसे, उत्तर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, दक्षिण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले, पं.स.गट विकास अधिकारी सचिन खुडे, गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

सदराची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरील जुना राजवाडा, नेहरू गल्ली, श्री कमलाराजे चौक, ए-वन चौक, नवीन राजवाडा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक (बस स्थानक), विजय चौक, तारामाता चौक, कारंजा चौक, मेन रोड, वीर सावरकर चौक, सेन्ट्रल चौक मार्गे समर्थ चौक ते राजे फत्तेसिंह चौक सर्जेराव जाधव पथ येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

या मिरवणुकीस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे (ना.अजितदादा गट), माजी विरोधी पक्ष नेते अशपाकभाई बळोरगी, शिंदे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, लाला राठोड, जेष्ठ नेते सोपनराव गोंडाळ, विधिज्ञ अँड.संतोष खोबरे, मुस्लीम समाज संघटनाचे अध्यक्ष एजाज मुतवल्ली, माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, रासप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल बंडगर, आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, राज शिंदे, अभिनंदन गांधी, अँड. विजय हर्डीकर, अँड. लखन गायकवाड, डॉ.आर.व्ही.पाटील, लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, अविराज शिद्धे, सिद्धेश्वर मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष (ना.अजितदादा गट) शिवराज स्वामी, डॉ.विनायक बुधले, सुभाष पुजारी, माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर, मैनुद्दीन कोरबू, शकील पठाण, नन्नु कोरबू, दीपक जरीपटके, सुनिल खवळे, अंकुश चौगुले, पिंटू सोनटक्के, भाजपा शहर सरचिटणीस बाळासाहेब शिंदे, सिध्दाराम टाके, बालाजी पाटील, ऋषी लोणारी, शिंदे गटाचे शहर प्रमुख योगेश पवार, राम मातोळे, अभियंता किरण पाटील, अमित थोरात, अरविंद शिंदे, पै.मौला शेख, पै.महेश कुलकर्णी, छत्रपती प्रतिष्ठानचे गणेश गोब्बुर, सर्फराज शेख, मनोज इंगोले, लखन झंपले यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक संपन्न झाली. निघालेल्या मिरवणुकीचे विविध सामाजिक संघटना व पक्षाने स्वागत केले. मिरवणूक यशस्वीसाठी अमोलराजे भोसले मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

*⭕चौकट :
मिरवणुकीत सामील होणाऱ्या शिवभक्तांना निकम बंधू यांचे हॉटेल राज प्रिया कडून अल्पोपहार देण्यात आला. मुस्लीम समाजाकडून कारंजा चौक येथे सुगंधी दुध वाटप करण्यात आले. नाईकवाडी गल्ली यंग कमिटीकडून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button